प्राजक्ता माळीच्या हातावरील टॅटूत दडलंय 'या' खास व्यक्तीचं नाव; अभिनेत्रीनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 11:51 AM2023-07-31T11:51:22+5:302023-07-31T11:56:26+5:30

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा हातावरील टॅटू सध्या खूप चर्चेत आला आहे. तिच्या या टॅटूवर एका खास व्यक्तीचे नाव दडलं आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. तिने आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर ती महाराष्ट्राची क्रश बनली आहे. प्राजक्ता सातत्याने चर्चेत येत असते.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.

प्राजक्ता माळीचे सोशल मीडियावर फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. प्राजक्ता माळीचा हातावरील टॅटू सध्या खूप चर्चेत आला आहे. तिच्या या टॅटूवर एका खास व्यक्तीचे नाव दडलं आहे. तुम्ही म्हणाला कोण आहे हा व्यक्ती?

प्राजक्ता माळीने तिच्या हातावर एका खास व्यक्तीचे नाव गोंदवून घेतले आहे. हे व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु ओशो.

एका मुलाखतीत प्राजक्तानं आपला टॅटू दाखवत तो गोंदवण्यामागचे कारण देखील सांगितले होते. तिला तिच्या हातावर नेहमीपेक्षा काहीतरी हटके टॅटू हवा होता.

याबद्दल प्राजक्ता म्हणाली की, 'रेशीमगाठी' दरम्यान तिने अनेक पुस्तकांचे वाचन आणि सीडी ऐकत होती. त्यावेळी खास ओशो फिवर असल्यामुळे प्राजक्ताने तो टॅटू केला. इतरांप्रमाणे पाने, फुले, पक्षी असे न गोंदवत सतत जगण्याची प्रेरणा देत राहील असा टॅटू करण्याची प्राजक्ताची इच्छा प्राजक्ताची होती.

ओशो हे कुठल्या धर्माचे नाहीत. त्याप्रमाणेच मी धर्म, जात असे काही मानत नाही. ओशोंचे विचार ऐकल्यावर मी खूप प्रभावित झाले. अभिनेत्री असल्याने तो कोणाला दिसून येऊ नये यासाठी तो बोटांच्या मधल्या गॅपमध्ये गोंदवायचा होता पण तिथे फारसे मांस नसल्याने तो तिथे न गोंदवता मनगटाच्या जवळ गोंदावे लागले, असे प्राजक्ता सांगते.

प्राजक्ता माळी पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये दिसणार आहे. या कार्यक्रमाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे.