अप्सरा अन् तिच्या सासूबाईंचं आहे खास नातं; पाहा कशा दिसतात सोनाली कुलकर्णीच्या सासूबाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 07:00 AM2022-05-12T07:00:00+5:302022-05-12T07:00:01+5:30

Sonalee kulkarni: सध्या सोशल मीडियावर सोनालीच्या सासुबाईंची चर्चा रंगली आहे. सोनालीने तिच्या सासूबाईंसोबतचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. उभ्या महाराष्ट्राची अप्सरा होत तिने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं.

नटरंग, मितवा, धुरळा अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यातच अलिकडे तिचा झिम्मा हा चित्रपटही प्रदर्शित झाला.

उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे सोनालीची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा असते. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक असतात.

कलाविश्वासह सोशल मीडियावर सक्रीय असलेली सोनाली तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफशी निगडीत गोष्टीची चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सोनाली अनेकदा तिचा पती कुणाल बेनोडेकर याच्यासोबतचे फोटो शेअर करत असते सोनाली-कुणालने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली.

सध्या सोशल मीडियावर सोनालीच्या सासुबाईंची चर्चा रंगली आहे. सोनालीने तिच्या सासूबाईंसोबतचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

सोनालीच्या सासूबाईंचं नाव छाया बेनोडेकर आहे. अलिकडेच सोनालीने एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांमध्ये तिच्या सासूबाईंची चर्चा रंगली.

छाया बेनोडेकर सोशल मीडियावर सक्रीय असून त्या बऱ्यापैकी कूल असल्याचं पाहायला मिळतं. त्यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सोनालीसोबतच काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.