'मिर्झापूर'फेम मुन्ना भैय्याची पत्नी आहे प्रचंड बोल्ड; तिच्या सौंदर्यापुढे अनेक अभिनेत्री आहेत फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 07:00 AM2022-05-30T07:00:00+5:302022-05-30T07:00:01+5:30

Divyenndu sharma:दिव्येंदू शर्माचं लव्हमॅरेज असून त्याने २०११ मध्ये त्याची कॉलेज फ्रेंड आकांक्षासोबत लग्न केलं.

मिर्झापूर या सीरिजला विसरणं कोणाला शक्य नाही. ओटीटीवर ही सीरिज प्रचंड गाजली.

पंकज त्रिपाठी, अली फजल, विक्रांत मेस्सी, श्वेता त्रिपाठी यांची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजमधील मुन्ना भैय्यादेखील विशेष चर्चेत आला.

या सीरिजमध्ये मुन्ना भैय्या ही भूमिका अभिनेता दिव्येंदू शर्माने साकारली आहे.

मिर्झापूर, सिक्रेड गेम्स, प्यार का पंचनामा, टॉयलेट एक प्रेमकथा अशा चित्रपट, वेबसीरिजमध्ये दिव्येंदूने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

अनेक प्रोजेक्टमध्ये झळकलेल्या दिव्येंदूला खरी ओळख मिर्झापूरमुळे मिळाली. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी आतूर असतात.

अनेक प्रोजेक्टमध्ये झळकलेल्या दिव्येंदूला खरी ओळख मिर्झापूरमुळे मिळाली. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी आतूर असतात.

सध्या सोशल मीडियावर दिव्येंदू शर्माच्या पत्नीची चर्चा रंगली आहे.

दिव्येंदू शर्माचं लव्हमॅरेज असून त्याने २०११ मध्ये त्याची कॉलेज फ्रेंड आकांक्षासोबत लग्न केलं.

बराच काळ एकमेकांना डेट केल्यावर आकांक्षा-दिव्येंदूने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अलिकडेच दिव्येंदूने त्याच्या पत्नीसोबत एक फोटो शेअर केला तेव्हापासून सोशल मीडियावर आकांक्षाची चर्चा रंगली आहे.

आकांक्षा खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस असून ती बोल्डनेसच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींवर मात करते.

आकांक्षा कलाविश्वापासून दूर आहे. तसंच ती ज्वेलरी डिझायनर आहे.

आकांक्षा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.