छोटासा ड्रेस घालून रात्री पार्टीत पोहोचली बड्या उद्योगपतीची पत्नी, डीपनेकवर खिळल्या सर्वांच्या नरजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 00:00 IST2022-08-13T23:58:08+5:302022-08-14T00:00:18+5:30

Divya Khosla Kumar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माता दिग्दर्शक दिव्या खोसला कुमार टी-सिरीज म्युझिक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार यांची पत्नी आहे. दिव्या तिच्या सौंदर्यामुळे कोट्यवधी हृदयांवर राज्य करते.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माता दिग्दर्शक दिव्या खोसला कुमार टी-सिरीज म्युझिक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार यांची पत्नी आहे. दिव्या तिच्या सौंदर्यामुळे कोट्यवधी हृदयांवर राज्य करते.

हल्लीच तिला डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या घराबाहेर स्पॉट केले गेले. यादरम्यान, तिचा लूक पाहण्यालायक होता. तिने व्हाईट करलचा मिनी ड्रेस घातला होता. त्यात ती खूप सुंदर दिसत होती.

या डीपनेक शॉर्ट ड्रेसमध्ये दिव्या खोसला कुमार खूप सुंदर दिसत होती. तिने व्हाईट स्निकर्स शूज, ग्लोसी मेकअप आणि पिंक कलरच्या स्लिंग बॅगसह आपला लूक पूर्ण केला होता.

दिव्या खोसला कुमार सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. इन्स्ट्राग्रामवर तिचे ६.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. हल्लीच तिचं एक गाणं प्रसिद्ध झालं होतं, ते लोकांना खूप आवडलं होतं.

दिव्या आपल्या ग्लॅमरस फोटोंच्या माध्यमातून सोशल मीडियाचा पारा वाढवत असते. ३४ वर्षांच्या वयामध्ये दिव्याचं सौंदर्य तिच्या फॅन्सना प्रेमात पाडतं. इंटरनेटवर तिचे स्टायलिश फोटो खूप व्हायरल होतात.

दिव्या खोसला कुमारने २००५ मध्ये भूषण कुमारशी विवाह केला होता. तेव्हा तिचं वय केवळ २१ वर्षे एवढंच होतं. दोघांनीही वैष्णौदेवी मंदिरात सप्तपदी घेतली होती.

२०११ मध्ये हे दाम्पत्य एका मुलाचे आई-वडील बनले. दिव्याने २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या अब तुम्हारे हवाले वतन साथीयो चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.