PHOTOS: शूटिंगदरम्यान प्रेग्नंट होत्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहेत त्या अभिनेत्री By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 03:09 PM 2022-05-17T15:09:04+5:30 2022-05-17T17:23:17+5:30
बॉलिवूडच्या अभिनेत्रीं चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान प्रेग्नेंट राहिल्यामुळे त्यांना त्यांचं काम अर्ध्यात सोडावं लागलं. तर काहींनी मात्र बेबी बम्ब लपवत शूटिंग पूर्ण केलं. बॉलिवूडमध्ये अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतर अभिनयाला रामराम केला. कारण त्यांना त्यानंतर कुटुंब आणि बाळाची जबाबदारी घ्यायची असते. अनेक अभिनेत्रीं चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान प्रेग्नेंट राहिल्यामुळे त्यांना त्यांचं काम अर्ध्यात सोडावं लागलं. तर काहींनी मात्र बेबी बम्ब लपवत शूटिंग पूर्ण केलं. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना या प्रसंगाचा सामना करावा लागला आहे.त्यामुळे काही अभिनेत्रींचे निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत वाद देखील झाले.
'लाल सिंह चड्डा' या चित्रपटाच्या दरम्यान अभिनेत्री करीना कपूरला सुद्धा आपल्या दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचं कळलं. मात्र यावेळी कोरोनामुळे शूटिंग बंद होतं. शूटिंग पुन्हा सुरु होताचं करीनाने आपलं काम आधी उरकून घेतलं.
'वी आर फमिली' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री काजोलला दुसऱ्या प्रेग्नेंट असल्याचं समजलं होतं. यावेळी काजोलनं कोणतीही सुट्टी न घेता शूटिंग पूर्ण केलं. आणि त्यानंतर तिनं सुट्टी घेतली. 2010 मध्ये काजोलनं मुलगा युग याला जन्म दिला .
अभिनेत्री ऐश्वर्या रॉयला जेव्हा तिच्या प्रेग्नेंन्सीची माहिती मिळाली होती, तेव्हा तिच्या हातात मधुर भांडारकर यांचा 'हिरोईन' हा चित्रपट होता. मात्र प्रेग्नेंट असल्याचे समजताच ऐश्वर्यानं हा चित्रपट सोडून दिला. तेव्हा फिल्म मेकर मधुर भंडारकरने ऐश्वर्यावर राग देखील व्यक्त केला. आणि नंतर या चित्रपटात करीनाची वर्णी लागली होती.
'देवदास' चित्रपटाच्यावेळी अभिनेत्री माधुरी दीक्षितला ती प्रेग्नेंट असल्याचं समजलं. मात्र तरीसुद्धा तिनं गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं होतं. 'हम पे ए किसने हरा रंग डाला' या गाण्याच्या चित्रीकरणावेळी माधुरी दीक्षित 3 महिन्याची प्रेग्नेंट होती.
‘झंकार बीट्स’ चित्रपटाच्या वेळी जुही चावला दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती. मात्र तिने सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं.
‘जुदाई’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान श्रीदेवी प्रेग्नंट होती. त्यावेळी तिचे लग्नही झाले नव्हते. लग्न होण्यापूर्वीच ही अभिनेत्री प्रेग्नंट झाली होती. चित्रपटाच्या शूटिंगनंतर श्रीदेवीनं बोनी कपूरसोबत लग्न केलं. त्यानंतर जान्हवीचा जन्म झाला.
‘ओम शांती ओम’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना फराह खान प्रेग्नंट होती. असे असूनही, तीने चालू काम थांबवले नव्हते. नंतर फराहने तीन मुलांना जन्म दिला .