'हा भारत आहे, अमेरिका नाही..!' प्रियंका चोप्राचा ड्रेस पाहून संतापले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 04:12 PM2022-11-02T16:12:17+5:302022-11-02T16:17:15+5:30

Priyanka Chopra : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा तीन वर्षांनंतर भारतात परतली आहे आणि आता भारतात पहिल्यांदाच दिसल्याचे फोटो समोर आले आहेत.

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा तीन वर्षांनंतर भारतात परतली आहे आणि आता भारतात पहिल्यांदाच दिसल्याचे फोटो समोर आले आहेत.

प्रियांकाचा हा लूक पाहून तिला खूप ट्रोल केले जात आहे कारण अभिनेत्रीचा आउटफिट पाहून नेटकरी संतापले आहेत.

प्रियांकाचा हा लूक पाहून लोक अभिनेत्रीला आठवण करून देत आहेत की, हा भारत आहे, अमेरिका नाही,

प्रियांका चोप्रा जोनस तीन वर्षांनंतर भारतात परतली आहे. आई झाल्यानंतर प्रियांकाचा भारतातला पहिला दौरा आहे आणि तिच्यासोबत ती लेकीला घेऊन आली नाही.

प्रियांका तिच्या कामाची कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी भारतात आली आहे.

प्रियंका तिच्या हेअर केअर ब्रँडसाठी दिसली होती. यावेळी तिने व्हाइट फ्लेअर पॅंट आणि पांढरा क्रॉप टॉप घातला आहे.

प्रियांकाचा हा लूक खळबळ माजवत आहे कारण तिच्या क्रॉप टॉपमधून क्लीवेज दिसत आहे. त्यामुळे प्रियंकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.