मानसी-तेजसची लग्नानंतरची पहिली संक्रांत, 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेच्या विशेष भागाची खास झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 16:15 IST2025-01-11T15:59:55+5:302025-01-11T16:15:02+5:30
'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिकेत मकरसंक्रांतीचा विशेष भाग रंगणार आहे. बघा या खास भागाची झलक (thoda tuza ani thoda maz)

'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका स्टार प्रवाहवर चर्चेत आहे. या मालिकेत मानसी-तेजसची लग्नानंतरची पहिली संक्रांत रंगणार आहे
या विशेष भागाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीय. यात मानसी वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन संक्रांत साजरी करणार आहे
मानसी-तेजसने संक्रांतीसाठी एकमेकांना साजेसे कपडे परिधान केलेले दिसून येत आहेत. याशिवाय मानसीने हलव्यांचे दागिनेही चढवले आहेत
मानसी-तेजसने संक्रांतीनिमित्त खास फोटोशूटही केलेलं दिसतंय. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतील या जोडीला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली आहे
मानसीची भूमिका अभिनेत्री शिवानी सुर्वेने साकारली आहे. तेजसच्या भूमिकेत अभिनेता समीर परांजपे झळकताना दिसत आहे
'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका प्रोमोपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेत होती. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर बघायला मिळेल
'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतील मानसी-तेजस या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांचं मन जिंकून गेली. कौटुंबिक कथानकामुळे ही मालिका आज घराघरात पाहिली जाते