Tiger shroff exercising in home in lockdown PSC
घरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 04:08 PM2020-04-01T16:08:55+5:302020-04-01T16:22:41+5:30Join usJoin usNext कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. लॉकडाऊनमुळे सध्या सगळ्या जीम बंद असल्याने टायगर श्रॉफ त्याच्या घरातच व्यायाम करत आहे. टायगरचा घरी व्यायाम करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. टायगर त्याच्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सतर्क असून तो न चुकता दररोज जीममध्ये जातो. टायगरच्या अभिनयासोबतच त्याच्या फिटनेसची चर्चा नेहमीच रंगते. त्याचे फॅन्स तर त्याच्या अॅब्सवर फिदा आहेत. टायगरचा बागी 3 हा चित्रपट काहीच आठवड्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले आहे. टायगरला बॉलिवूडमध्ये एंट्री करून काहीच दिवस झाले असले तरी त्याने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. त्याला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून सोशल मीडियावर तर त्याचे फॅन्स त्याला मोठ्या संख्येने फॉलो करतात.टॅग्स :टायगर श्रॉफtiger Shroff