लग्नानंतर १ वर्षातच नवऱ्याने सोडलं, दुसरा संसारही मोडला; २ मुली पदरात घेऊन आयुष्य जगतेय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 03:14 PM2024-08-30T15:14:22+5:302024-08-30T15:26:34+5:30

करिअरमध्ये यशाची उंची गाठणाऱ्या अभिनेत्रीला खऱ्या आयुष्यात मिळालं नाही प्रेम, दोन घटस्फोटांनंतर जगतेय असं आयुष्य

'बडे अच्छे लगते है', 'शाका लाका बुम बुम', 'तुझ संग प्रीत लगाई सजना', 'कबुल है', 'काजल' अशा सुपरहिट मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री चाहत खन्ना घराघरात पोहोचली.

काही सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. करिअरमध्ये यशाची उंची गाठणाऱ्या चाहतला मात्र वैयक्तिक आयुष्यात खरं प्रेम मिळालंच नाही.

अभिनेत्रीने दोन वेळा लग्न केलं. पण, दोन्ही वेळेस ती कमनशिबीच ठरली. चाहतचं पहिलं लग्न एका वर्षातच मोडलं तर तिचा दुसरा संसारही टिकला नाही.

चाहतने २००६ साली भरत नरसिंघानीशी लग्न केलं होतं. तेव्हा ती केवळ २० वर्षांची होती. लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच नवऱ्याने तिला घटस्फोट दिला.

पहिलं लग्न मोडल्यानंतर चाहतने २०१३ मध्ये पुन्हा लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. फरहान मिर्जाशी तिने विवाह केला होता.

दुसऱ्या लग्नानंतर चाहतचं वैवाहिक जीवन सुखी होतं. चाहत आणि फरहानला दोन मुलीही झाल्या. पण, तिच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली.

लग्नानंतर पाच वर्षांनी २०१८ मध्ये फरहानबरोबर घटस्फोट घेण्यासाठी तिने कोर्टात धाव घेतली होती. चाहतने तिच्या नवऱ्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचे गंभीर आरोप केले होते.

फरहान संशय घेत असल्याचं तिने सांगितलं होतं. त्याबरोबरच इच्छा नसतानाही जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तो भाग पाडत असल्याचा खुलासाही तिने केला होता.

पण, मुलींसाठी हे सगळं सहन करत असल्याचं चाहतने सांगितलं होतं. आता चाहत तिच्या दोन मुलींचा सांभाळ करत आहे.