Tv actress Niti Taylor had hole in heart when she was born her life story
जन्मत:च हृदयात छिद्र, डॉक्टरांनीही मानलेली हार; आज तरुणाईची लाडकी आहे 'ही' अभिनेत्री By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 03:34 PM2024-08-07T15:34:56+5:302024-08-07T15:42:34+5:30Join usJoin usNext एका मालिकेने अभिनेत्रीचं नशीबच बदललं 'कैसी ये यारियाँ' मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री. जिच्या सौंदर्यावर, क्युटनेसवर चाहते फिदा आहेत. मात्र प्रसिद्धी मिळण्यापूर्वी तिने बऱ्याच संकटांचा सामना केला आहे. कोण आहे ही अभिनेत्री? 'बडे अच्छे लगते है' मालिकेत दिसलेली ही अभिनेत्री आहे नीति टेलर (Niti taylor). नीतिला 'कैसी ये यारियाँ' सीरिअलमुळे प्रसिद्धी मिळाली. ही सीरिअल तरुणाईमध्ये भलतीच लोकप्रिय झाली होती. नीतिच्या क्युटनेस चाहते फिदा होते. तुम्हाला माहितीये का नीति लहानपणी मृत्यूच्या दाढेतून परत आली आहे. या विषयी तिने स्वत: डान्स रिएलिटी शोमध्ये सांगितले होते. डान्स रिएलिटी शोमध्ये परफॉर्मन्सवेळी नीति पडली होती. तेव्हा भावूक होऊन तिने सांगितले की, 'जन्मत: माझ्या हृदयात छिद्र होतं. डॉक्टरांनीही हार मानली होती. तेव्हा तिने याचा सामना केला आणि यावर मात केली. मात्र या आजारपणामुळे तिच्या आयु्ष्यावर परिणाम झाला. ती असंही म्हणाली की, 'जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा काही वेळासाठी माझा श्वास थांबला होता. मात्र अचानक मी जीवंत झाले. तेव्हापासूनच मी आयुष्यात स्ट्रगल पाहिलं आहे. त्यावेळी मला कोणत्याच रोमांचक गोष्टी करता येत नव्हत्या. तरी माझी आई मला शेरनी म्हणायची.' ती पुढे म्हणाली, 'मला डान्स करायला खूप आवडायचं. पण आजारामुळे मला ते करता यायचं नाही. जेव्हा ऑपरेशन यशस्वी झालं तेव्हा मी आनंदाने प्रफुल्लित झाले होते.' नीति टेलर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिने परीक्षित बावासोबत लग्न केले आणि नंतर ती संसारात रमली. काही दिवसांपूर्वी तिचा घटस्फोट होत असल्याच्याही चर्चा झाल्या. मात्र नंतर त्या अफवा असल्याचं स्पष्ट झालं. टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजनTV CelebritiesTelevision