वयाची पन्नाशी उलटूनही उर्मिला मातोंडकर आजही दिसते तितकीच ग्लॅमरस, फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 03:52 PM2024-08-31T15:52:18+5:302024-08-31T15:57:49+5:30

Urmila Matondkar : नव्वदच्या दशकातील अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सोशल मीडियावरील लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.

नव्वदच्या दशकातील अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सोशल मीडियावरील लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने वयाची पन्नाशी उलटली असली तरी आजही ती तितकीच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसते.

उर्मिला मातोंडकर ही अभिनयापासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.

नुकतेच उर्मिलाने सोशल मीडियावर काही स्टनिंग फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत उर्मिला मातोंडकर खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

या फोटोत उर्मिलाने व्हाइट रंगाचा को-ओर्ड सेट परिधान केला आहे.

तिने लूक पूर्ण करण्यासाठी हातात ब्रेसलेट आणि गळ्यात नेकलेस घातला आहे. तसेच गॉगल घातला आहे.

उर्मिलाच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

उर्मिला मातोंडकर हिने बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक बॉलिवूड सिनेमामधून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती.

उर्मिला मातोंडकरने मोहसिन अख्तर मीर या काश्मिरी तरुणासोबत विवाह केला आहे.

तसेच तिने २०१९ मध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर तिने शिवसेनेत प्रवेश केला होता.