उर्मिला मातोंडकरचे पतीसोबतचे रोमँटीक फोटो, सोशल मीडियावर व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 11:05 AM 2020-11-24T11:05:46+5:30 2020-11-24T11:16:33+5:30
'''छम्मा छम्मा'' करत मासूम गर्ल, मस्त गर्ल, रंगीला गर्ल अशी कितीतरी नावं रसिकांची तिनं मिळवली. लग्नानंतर उर्मिला बॉलिवूडपासून दूर जात वैवाहिक आयुष्य एन्जॉय करतेय. वयाच्या ४२ व्या वर्षी उर्मिलाने उद्योगपती व मॉडेल मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्नगाठ बांधली.
उर्मिलाने 2016 मध्ये कश्मिरी व्यावसायिक मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले.
मोहसिन उर्मिलापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. ती कार्यक्रमात अनेकदा पती मोहसिनसोबत दिसते.
2014 मध्ये ‘अजुबा’ या चित्रपटातून उर्मिलाने कमबॅक केले. पण तिचे हे कमबॅक अपयशी ठरले.
2018 मध्ये ‘ब्लॅकमेल’ सिनेमात एक आयटम साँग करताना दिसली. पण तिला कुणीही म्हणावे तसे नोटीस केले नाही.
गेली अनेक वर्ष बॉलीवुड गाजवणारी मासूम गर्ल हिंदीत काम मिळेनासं झाल्यानं लाइमलाइटपासून दूर राहून आपले खासगी आयुष्य एन्जॉय करतेय.
लग्नानंतर उर्मिला बॉलिवूडपासून दूर आहे. पण एकेकाळी उर्मिला यशाच्या शिखरावर होती.
याच काळात तिच्या आयुष्यात एका व्यक्तिची एन्ट्री झाली. असे म्हणतात की, याच व्यक्तिमुळे उर्मिलाचे करिअर उद्धवस्त झाले.
ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती व्यक्ती होती दिग्दर्शक राम गोपाल वर्मा.
उर्मिलाला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली ती राम गोपाल वर्मांच्या 'रंगीला' या सिनेमाने.