उर्वशी रौतेला आता घेतेय लखनवी भाषेचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या… By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 08:51 PM 2021-03-11T20:51:52+5:30 2021-03-11T20:59:35+5:30
Urvashi Rautela learning Lucknow language : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. अभिनेत्री उर्वशी आपल्या युनिक स्टाईलसाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या कामापेक्षा कमी मात्र महागड्या फॅशन स्टेटमेंटमुळे जास्त चर्तेत होती. आता ती पुन्हा तिच्या कामाकडे वळली आहे.
सध्या नवनवीन गोष्टी शिकण्यात ती व्यस्त आहे. उर्वशी तिच्या कामात व्यस्त असूनही ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना तिच्या रुटीनविषयी अपडेट करत रहात असते.
तिचे मागो माग येणारे आगामी चित्रपटांसाठी चर्चेत आहे आणि असे वाटते ह्या वर्षी उर्वशी रौतेला म्युझिक विडिओ पासून ते वेब सिरीज पॅरेंत सगळ्याच गोष्टी करणार आहे.
उर्वशी रौतेला वेब सिरीज "इन्स्पेक्टर अविनाश" मध्ये पूनम मिश्रा म्हणजेच अविनाश मिश्राच्या बायकोची भूमिका साकारत आहे, ह्यात पूनम मिश्राच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत आहे
भूमिकेसाठी तिच्या वागण्या बोलण्यापासून ते चेह-यावरील हावभाव यावरही ती मेहनत घेत आहे.
पूर्णपणे त्या भूमिकेत तिने स्वतःला झोकून दिले आहे. या भूमिकेसाठी उर्वशी रौतेला लखनवी भाषेचेही धडे घेत असून या भाषेतील संवादफेकीवर ती बरीच मेहनत घेत आहे.
इतकंच नाही तर तिला काही काही पुस्तकं सुद्धा वाचण्यासाठी देण्यात आली आहेत. वेब सिरीजचे डायरेक्टर नीरज यांच्या मदतीने उर्वशी रौतेला रोज लखनवी अंदाज मध्ये सेट बोलण्याचा सराव करते.
सेटवरील उर्वशीचे काही फोटो देखील समोर आले आहेत.उर्वशी रौतेलासोबत “इंस्पेक्टर अविनाश” वेबसिरिजीमध्ये अभिनेता रणदीप हूडादेखील झळकणार आहे.
आगामी काळातही उर्वशी आणखी बड्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. त्यामुळे या वर्षी विविध अंदाजात पाहणे तिच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असणार आहे.
थ्रिलर वेबसिरिज पोलिस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या जीवनातील वास्तविक घटनांवर आधारित आहे. 'सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. आगामी काळात उर्वशी विविध भूमिका साकारत रसिकांच्या भेटीला येणार आहे.