रुग्णालयात दाखल असलेल्या उर्वशीला चाहत्याने पाठवले 1 लाख गुलाब

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:34 PM2024-08-29T12:34:09+5:302024-08-29T12:42:16+5:30

उर्वशीला एका "डायहार्ड फॅन"ने तब्बल 1 लाख लक्झरी गुलाब पाठवले.

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

काही दिवसांपुर्वी बोटाला छोटी जखम झाल्याने उर्वशी रुग्णालयात दाखल झाली. सोशल मीडियावर पोस्ट करत तिनं चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती.

उर्वशी रुग्णालयात असताना तिला तिच्या चाहत्यांनी जवळपास 1 लाख गुलाब भेट म्हणून दिले आहेत. सोशल मीडियावर तिने याचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

उर्वशीने तिचा रुग्णालयातला व्हिडिओही शेअर केलाय. या व्हिडीओला कॅप्शन देत उर्वशीने म्हटलं की, माझ्यासाठी प्रार्थना करा. एका व्हिडीओमध्ये ती खुर्चीवर बसलेली असून ऑक्सिजन मास्क लावलं आहे.

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करत लिहलं, 'मी लवकर बरी व्हावी यासाठी माझ्या एका चाहत्याने मला 1 लाख गुलाब पाठवले आहेत'.

उर्वशीने गुलाबांसोबतचे फोटो शेअर केल्यावरुन नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलंय.

एका युजरने कमेंट करत म्हटलं की, 'हिने स्व:ताच हे सगळे गुलाब आणले असतील', तर एकाने लिहलं, 'हिचे चाहतेही वेडे आहेत वाटतं'.

दरम्यान काही दिवसांपुर्वी उर्वशी ही बाथरुम व्हिडीओ लीकमुळे चर्चेत आली होती. उर्वशीचा तो एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं बोललं जातं होतं.

उर्वशी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

30 वर्षीय उर्वशीने सनी देओलच्या 'सिंग साहब द ग्रेट' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती अनेक सिनेमांमध्येही झळकली आहे. आता ती आगामी 'ब्लॅक रोज' या तेलुगु आणि 'दिल है ग्रे' या हिंदी सिनेमात दिसणार आहे.