Riteish Deshmukh: रितेश देशमुखने सांगितलं राजकारणात न जाण्यामागचं खरं कारण; म्हणाला- मी माझ्या भावांसाठी.............

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:20 PM2023-01-17T12:20:54+5:302023-01-17T16:38:29+5:30

रितेश देशमुखचं संपूर्ण कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणात असताना त्याने मात्र मनोरंजन क्षेत्रात येण्याचा निर्णय का घेतला ते जाणून घ्या.

२०२३चा दुसरा आठवडा संपला आणि आता तिसरा आठवडा सुरू झालाये. नव्या आठवड्यात सिनेप्रेमींना काही नवे सिनेमे रिलीज होण्याची प्रतीक्षा आहे. पण सर्वाधिक चर्चा आहे ती रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखाच्या ‘वेड’ या मराठी सिनेमाची. ‘वेड’ने बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं आणि आता तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे. ‘वेड’ हा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. शनिवारपर्यंत या चित्रपटाने एकूण ४४.९२ कोटींचा गल्ला जमवला होता. लवकरच हा चित्रपट ५० कोटींचा आकडा पार करणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

‘वेड’ हा सिनेमा रितेश देशमुखने दिग्दर्शित केला आहे. त्याने दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा. रितेशच्या पहिल्याच प्रयत्नाला मोठ यश मिळालं आहे. खरं तर रितेश देशमुख महाराष्ट्राच्या राजकीय घराण्यातून येतो. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा तो मुलगा आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

याशिवाय रितेशचा थोरला भाऊ अमित देशमुख आणि धाकटा भाऊ धिरज देशमुख हे दोघंही महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. मात्र असे असूनही रितेशनं राजकारणात न जाता मनोरंजन क्षेत्राची निवड केली. (फोटो इन्स्टाग्राम)

मरजांवा सिनेमादरम्यान, मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने याबाबत खुलासा केला होता. रितेश देशमुखने मनोरंजन क्षेत्राची निवड का केली हे सांगताना म्हणाला होता की, मी माझे निर्णय स्वत: घेतो आणि इतरांच्या मतांचाही आदर करतो. राजकारण मी माझ्या भावांसाठी सोडलं आहे. माझं काम सिनेमात काम करणं आहे आणि मी ते करतोय. (फोटो इन्स्टाग्राम)

तो कधी सत्तेकडे आकर्षित झाला नाहीस का असा प्रश्न विचारताच अभिनेत्याने सांगितलं की, त्याने आयुष्यभर सत्ता पाहिली आहे, सत्ता त्याला तेवढी आकर्षित करत नाही. रितेशने सांगितलं की तो मनोरंजन क्षेत्रात खूप आनंदी आहे आणि हीच त्याची खरी ताकद आहे. वेड सिनेमाच्या निमित्ताने हे आधोरेखित झालं आहे की, सिनेमा हीच त्याची खरी ताकद आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

रितेशच्या वेडनं एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम ‘वेड’ने मोडीत काढला आहे. रिलीजच्या दुसऱ्या रविवारी 'वेड'ने ५.७० कोटींची कमाई केली होती. मीडिया रिपोर्टनुसार ‘सैराट’ची सर्वाधिक कमाई ४.६१ कोटींची होती. मात्र ‘सैराट’चा हा रेकॉर्ड 'वेड'ने मोडला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)