देशमुखांच्या सूनबाई म्हणतायेत, 'गेली १० वर्ष मी रितेश, मुलं, व सासूबाईंना सांभाळतेय, माझं आयुष्यच...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 07:00 AM2023-01-14T07:00:00+5:302023-01-14T07:00:07+5:30

जिनिलियाने रितेशी लग्न केल्यानंतर महाराष्ट्रीयन संस्कृतीला आपलं केलं. महाराष्ट्राची सून म्हणून जिनिलिया देशमुखने एक वेगळी ओळख निर्माण आहे.

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया डिसुजा-देशमुख (Genelia D'souza-Deshmukh) यांच्या वेड (Ved Marathi Movie) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली आहे. वेड या मराठी चित्रपटांना बऱ्याच बड्या बड्या चित्रपटांना मागे टाकले आहे. (Photo Instagram)

अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट आपले स्थान टिकवून ठेवले आहे.(Photo Instagram)

सलग १४व्या दिवशी या चित्रपटाने १.५३ कोटींची कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने एकूण ४०.१७ कोटींचा गल्ला जमवला आहे.(Photo Instagram)

या चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे तर जिनिलिया देशमुखने मराठी सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे. (Photo Instagram)

पहिल्याच मराठी सिनेमात जिनिलियाच्या भूमिकेचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये ती फक्त घर, संसार आणि मुलं सांभळत होती याबाबत तिनं भाष्य केलं आहे. (Photo Instagram)

लोकसत्ताला दिलेल्या मुलाखती जिनिलिया म्हणाली, ''गेल्या दहा वर्षांपासून मी गृहिणी आहे. माझी मुलं, रितेश आणि त्याची आई यांच्याबरोबर मी आहे. हे लोकचं माझं आयुष्य आहेत.'' (Photo Instagram)

मी गृहिणी आहे याबाबत मला कमीपणा वाईट नाही. मी यात आनंदी आहे. माझं आयुष्य माझं घर आहे.'' महाराष्ट्राची सून म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. (Photo Instagram)

रितेश जिनिलियाने ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केले. आता त्यांना दोन मुले आहेत. देशमुख घराण्याची सून झालेल्या जिनिलिया चांगलं मराठी बोलते. (फोटो इन्स्टाग्राम)

जिनिलियाने रितेशी लग्न केल्यानंतर महाराष्ट्रीयन संस्कृतीला आपलं केलं. अनेक सर्वाजनिक कार्यक्रमात आपण तिला महाराष्ट्रीय पेहरावात पाहिलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)