Satya Manjrekar :‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये झळकलेल्या सत्या मांजरेकरबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 04:32 PM2022-11-07T16:32:11+5:302022-11-07T16:40:08+5:30

Vedat Marathe Veer Daudale Saat, Satya Manjrekar : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे...

दिश्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतेच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सात पराक्रमी मावळ्यांच्या शौर्याची गाथा ते या चित्रपटातून सांगणार आहेत.

या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर हा सुद्धा या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात मांजरेकरांचा मुलगा सत्या हा दत्ताजी पागे ही भूमिका साकारतोय. सध्या त्याचीच चर्चा आहे. आज याच सत्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सत्या हा महेश मांजरेकर यांचा मुलगा आहे. रामनारायण रुईया कॉलेजमधून त्याचं महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि सत्या अभिनयाच्या दुनियेत आला.

1995 साली रिलीज झालेला ‘आई’ हा सत्याचा पहिला सिनेमा. याच सिनेमातून त्याने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली.

2005 साली त्याचा बॉलिवूड डेब्यू झाला. ‘वाह, लाईफ हो तो ऐसी’ या बॉलिवूडपटात तो झळकला.

पोर बाजार आणि जाणिवा या चित्रपटात काम केलं. महेश यांनी दिग्दर्शित केलेल्या एफयू : फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटातही तो दिसला होता.

‘1962- द वॉर इन हिल्स’ या वेबसीरिजमधून त्याने डिजिटल जगतात पाऊल टाकलं. या सीरिजमध्ये अभय देओल, सुमीत व्यास, आकाश ठोसर, अनुप सोनी, माही गिल असे अनेक कलाकार झळकले होते.