Vicky Katrina Wedding Anniversary : 'विकी कॅटरिना'च्या लग्नाला १ वर्ष पूर्ण; राजस्थानच्या शाही पॅलेसमध्ये झाला होता विवाहसोहळा By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 11:08 AM 2022-12-09T11:08:43+5:30 2022-12-09T11:20:09+5:30
बॉलिवुडचे क्युट कपल विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. दोघांचेही रिलेशनशिप एकदम सिक्रेट होते. दोघांचेही रिलेशन म्हणजे एक गुपितच होते. काही महिन्यांच्या डेटिंगनंतर दोघांनीही लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ९ डिसेंबर २०२१ ला विकी कॅटरिनाने राजस्थान येथे डेस्टिनेशन वेडिंग केले. अगदी मोजक्या पाहुण्यांसह हा शाही विवाहसोहळा पार पडला.
राजस्थानसारख्या सुंदर, ऐतिहासिक ठिकाणी सवाई माधोपुरमध्ये सिक्स सेन्सेस किला बरवारा येथे त्यांनी लग्न केले.
तीन दिवसांच्या या विवाहसोहळ्यात हळद, मेहेंदी, संगीत असे सर्व फंक्शन होते. या सोहळ्याचे फोटोही प्रायव्हेट ठेवण्यात आले होते.
लग्नानंतर कॅटरिनाने पहिल्यांदा विकी साठी शिरा बनवला होता त्याचे फोटो शेअर केले होते.
लग्नानंतर त्यांचे सिक्स सेन्सेस फोर्ट येथे सूर्यप्रकाशात केलेले फोटोशुट खुप व्हायरल झाले. अतिशय राजेशाही थाटात त्यांचे हे फोटोशुट होते.
कॅटरिनाने लग्नात सब्यसाचीने डिझाईन केलेला लहंगा घातला होता. लाल रंगाच्या लहंग्यामध्ये कॅटरिना खुपच सुंदर दिसत होती.
विकीचा लुकही खुप फ्रेश होता. गुलाबी रंगाचा फेटा, ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी असा विकीचा लुक होता
बघता बघता आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.