प्रियांकाप्रमाणेच होणार विकी-कतरिनाचं रॉयल वेडिंग; राजस्थानमधील 'या' पॅलेसमध्ये बांधणार साताजन्माची गाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 01:39 PM2021-10-28T13:39:41+5:302021-10-28T13:48:15+5:30

vicky-katrina wedding venue: विकी किंवा कतरिना या दोघांकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून या लग्नाविषयी कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांची चर्चा आहे.

कलाविश्वात सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या पर्सनल लाइफचीही जोरदार चर्चा होत असते. यामध्येच गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या दोघांच्या अफेअर्सची चर्चा सुरु आहे.

चित्रपटाच्या स्क्रीनिंगपासून ते डिनर डेटपर्यंत अनेक ठिकाणी या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे ही जोडी एकमेकांना डेट करत असून लवकरच ते लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सोशल मीडियावर होत असलेल्या लग्नाच्या चर्चांवर अद्यापही विकी किंवा कतरिनाने उघडपणे कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र, त्यांच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे.

या वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये ही जोडी लग्न करणार असून त्यांनी लग्नासाठी wedding venue सुद्धा निश्चित केल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात नमूद केलं आहे.

विकी आणि कतरिना राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं म्हटलं जातं.

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे लग्न करणार आहेत.

Six Senses Fort Barwara या पॅलेसमध्ये विकी- कतरिना लग्न करणार आहेत.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही जोडी राजेशाही थाटात लग्न करणार आहे.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची यांच्या खांद्यावर कतरिनाचा लेहंगा डिझाइन करण्याची जबाबदारी आहे.

दरम्यान, विकी किंवा कतरिना या दोघांकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून या लग्नाविषयी कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कतरिनाची आई सुझान आणि बहीण इसाबेल हे खरेदी करताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य: Six Senses Fort Barwara/ विकी-कतरिना इन्स्टाग्राम पेज)

Read in English