मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशल! कतरिना व विकीच्या या रोमॅन्टिक फोटोंवरून नजर नाही हटणार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 03:31 PM2021-12-14T15:31:44+5:302021-12-14T15:39:00+5:30

Vicky Kaushal Katrina Kaif Pre-Wedding Photoshoot : विकी कौशल व कतरिना कैफ लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशल आपल्या शाही विवाहसोहळ्याचे विविध फोटो शेअर करत आहेत.

विकी कौशल व कतरिना कैफ लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशल आपल्या शाही विवाहसोहळ्याचे विविध फोटो शेअर करत आहेत.

आता विकी व कतरिनाने लग्नाआधीच्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

पिच रंगाची साडी, डोक्यावर ओढणी आणि तिच्या साडीला मॅच असलेला पिच कलरचीच शेरवानी अशा आऊटफिटमध्ये मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशिकने रोमॅन्टिक पोझ दिल्या आहेत.

सुंदर जोडप्याचे हे सुंदर रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतोय.

अवघ्या तीन तासांत या फोटोंना 31 लाखांवर लोकांनी लाईक्स केलं आहे. कमेंट्स तर विचारू नका.

या फोटोंमध्ये विकी व कॅटच्या डोळ्यातील भावना लपता लपत नाहीये. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसत आहेत.

Read in English