Chhaava Star Cast Fees: 'छावा'साठी विकी कौशलने घेतलं तगडं मानधन, रश्मिका आणि इतर स्टार्सनं किती घेतली फी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:23 IST2025-02-11T16:14:58+5:302025-02-11T16:23:41+5:30
Chhaava Star Cast Fees: विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांना तो खूप आवडला असून ते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टच्या फीबद्दल सांगणार आहोत.
छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशलने साकारली आहे.
टाईम्स नाऊ हिंदीच्या रिपोर्टनुसार, विकी कौशलने हे पात्र साकारण्यासाठी १० कोटी रुपये मानधन आकारले आहे.
या चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना दिसणार आहे. येसूबाई भोसले यांची भूमिका तिने साकारली आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला ४ कोटी रुपये मिळाले आहेत.
'दृश्यम २' नंतर अक्षय खन्ना 'छावा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी त्याला २ कोटी रुपये फी देण्यात आली आहे.
या चित्रपटात अभिनेता आशुतोष राणा सरसेनापती हंबीराव मोहिते यांची भूमिका साकारत आहे. यासाठी त्यांना ८० लाख रुपये मिळाले आहेत.
विकी कौशलच्या या चित्रपटात दिव्या दत्ताचीही महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला ४५ लाख रुपये मिळाले आहेत.
विकी कौशल आणि रश्मिका पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.