विकी कौशलचा चित्रपट 'गोविंदा नाम मेरा' या दिवशी OTTवर येणार भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:20 IST2022-12-12T16:18:52+5:302022-12-12T16:20:57+5:30
Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'गोविंदा नाम मेरा' चित्रपट ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'गोविंदा नाम मेरा' चित्रपट ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या विनोदी चित्रपटात विकी कौशलसोबत भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी देखील दिसणार आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन बॅनरखाली बनलेल्या 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटात विकी कौशल पहिल्यांदाच कॉमेडी करताना दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या चित्रपटात विकी कौशल डान्सरच्या भूमिकेत दिसत आहे, तर भूमी पेडणेकर त्याची पत्नी गौरीची भूमिका साकारत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
त्याचवेळी कियारा आडवाणी विकी कौशलची मैत्रीण सुकूची भूमिका साकारत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शशांक खेतान दिग्दर्शित 'गोविंदा नाम मेरा' हा क्राईम कॉमेडी चित्रपट १६ डिसेंबर रोजी थेट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)