विद्या बालनचा 'शेरनी' स्वॅग, पदरावर वाघाची प्रिंट असलेल्या साडीत अभिनेत्रीने केले फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 06:04 PM2021-06-08T18:04:27+5:302021-06-08T18:17:31+5:30

विद्या बालन लवकरच 'शेरनी' चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन लवकरच शेरनी चित्रपटात झळकणार आहे.

विद्या बालनचा आगामी चित्रपट शेरनीचा ट्रेलर आणि पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. त्यानंतर चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

विद्या बालन या चित्रपटात वन अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे.

विद्या बालनने नुकतेच पदरावर वाघाची प्रिंट असलेल्या साडीत फोटोशूट केले आहे.

विद्या बालनचे हे फोटोशूट चाहत्यांना भावले आहे.

विद्या बालनचा शेरनी चित्रपट १८ जूनला रिलीज होणार आहे.

न्यूटन फेम अमित मसुरकरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

विद्या बालन बऱ्याचदा साडीतील फोटो शेअर करत असते.

विद्या बालनचे इंस्टाग्रामवर ३.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.