'मिर्झापूर 3' मधील गुड्डू पंडितची बहिण 'डिंपी'ने या विषयात केलंय शिक्षण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 01:56 PM2024-07-12T13:56:51+5:302024-07-12T14:06:02+5:30

'मिर्झापूर 3' मधील गुड्डू पंडितची बहिण डिंपीच्या आजवरच्या अभिनय प्रवासाबद्दल जाणून घ्या (mirzapur 3)

'मिर्झापूर 3' मधील गुड्डू पंडितची बहीण डिंपीची भूमिका गेले तीनही सीझन लक्षवेधी ठरली. डिंपीची भूमिका साकारलीय हर्शिता गौर या अभिनेत्रीने

हर्शिता गौर ही वेबसीरिजमध्ये सोज्वळ अंदाजात दिसत असली तरीही रिअल लाईफमध्ये ती ग्लॅमरस अदांमध्ये पाहायला मिळते.

हर्शिता गौरचा ही ३३ वर्षांची असून १२ ऑक्टोबर १९९० साली तिचा जन्म झाला

नॉयडामधील अमिटी युनिव्हर्सिटीमधून तिने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विषयात डिग्री मिळवली

अभिनयासोबतच हर्शिता गौरला डान्सची सुद्धा आवड आहे

हर्शिता गौरने २०१३ साली आलेल्या सड्डा हक या टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं

हर्शिता गौरने विविध जाहिरातींमध्येही काम केलं असून 'मिर्झापूर'मधील डिंपीच्या भूमिकेने ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली