या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे-वेबसीरिज होणार रिलीज, वाचा संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:35 IST2025-01-13T10:42:38+5:302025-01-13T11:35:54+5:30
या आठवड्यात ओटीटीवर अनेक वेबसीरिज आणि सिनेमे रिलीज होणार असून प्रेक्षकांना एंटरटेनमेंटची चांगलीच पर्वणी मिळणार आहे

गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली 'ब्लॅक वॉरंट' ही वेबसीरिज या आठवड्यातही चर्चेत आहे. माउथ पब्लिसिटीच्या जोरावर ही वेबसीरिज या आठवड्यात ट्रेंडिंग आहे
प्राइम व्हिडीओवर १७ जानेवारीला गाजलेल्या 'पाताल लोक' वेबसीरिजचा दुसरा सीझन रिलीज होणार आहे. जयदीप अहलावत वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत.
अभिषेक बच्चनच्या सहजसुंदर अभिनयाने २०२४ ला गाजलेला I want to talk सिनेमा प्राइम व्हिडीओवर १७ जानेवारीपासून पाहता येईल
जॅकी श्रॉफ यांची प्रमुख भूमिका असलेली 'चिडीया उड' ही वेबसीरिज या आठवड्यात mx प्लेअरवर रिलीज होणार आहे. या सिनेमात जॅकीसोबत सिकंदर खेर, भूमिका मीना झळकणार आहेत
सध्या कॅन्सरशी झुंज देणारी टीव्ही अभिनेत्री हिना खानची वेबसीरिज चर्चेत आहे. ‘गृह लक्ष्मी' असं या सीरिजचं नाव असून १६ जानेवारीला एपिक ऑन या ओटीटीवर रिलीज होणार आहे.
हृतिक रोशन-राकेश रोशन-राजेश रोशन यांच्या कुटुंबाची कहाणी असलेली 'द रोशन्स' ही वेबसीरिज १७ जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
सध्या चर्चेत असलेला 'पॉवर ऑफ फाइव्ह' हा शो १७ जानेवारीला हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. आदित्य राज अरोरा, जयवीर जुनेजा, यश सहगल, उर्वशी ढोलकिया हे कलाकार झळकणार आहेत.