'पंचायत' फेम रिंकी खऱ्या आयुष्यात भलतीच बोल्ड; फोटो पाहून नेटकरी म्हणाले, "सचिवजी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 01:53 PM2024-05-28T13:53:02+5:302024-05-28T14:08:06+5:30

'पंचायत' पासून रिंकीचे चाहते वाढलेत. ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या

ओटीटीवर सर्वात लोकप्रिय सीरिज 'पंचायत'(Panchayat) चा तिसरा भाग रिलीज झाला आहे. फुलेरा गावातल्या राजकारणावर मजेशीर कथा सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.

सीरिजमध्ये गावाचा सचिव आणि प्रधानजींची लेक रिंकीची हलकी फुलकी लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. जितेंद्र कुमारने सचिवची आणि अभिनेत्री सान्विकाने रिंकीची भूमिका साकारली आहे.

सीरिजमध्ये साधीसुधी दिसणारी रिंकी खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहित असेल. 'पंचायत'च्या चाहत्यांना सान्विकाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

सान्विकाने दमदार अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख मिळवली आहे. 'पंचायत'आधी तिने 'हजामत' आणि 'लखन लीला भार्गव' या सीरिजमध्ये काम केलं आहे. प्रत्येक भूमिकेत ती उठून दिसली आहे.

'पंचायत' च्या पहिल्या सिझनमध्ये सान्विकाची शेवटी झलक दिसते. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सिझनमध्ये तिची सचिवजींसोबत लव्हस्टोरी फुलते. सान्विकाने या सीरिजमधून सर्वांचंच मन जिंकलं.

सान्विकाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर २ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. रिंकीच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स आणि कमेंट्स येतात.

रिंकीने काही बोल्ड फोटोही पोस्ट केलेत. यावर चाहत्यांच्या मजेशीर कमेंट आहेत. 'सचिवजींचा अभ्यास का होत नाही याचं हेच कारण आहे' अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.