सई ताम्हणकर लग्न करायला तयार? म्हणाली, "मला एकटं राहायचं नाही पण आता..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 10:37 AM2024-09-16T10:37:33+5:302024-09-16T10:57:31+5:30

सईचे लग्नाबद्दलचे विचार ऐकलेत का?

अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar ) आगामी 'मानवत मर्डर्स' वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. आशुतोष गोवारीकर, सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरे यांच्या देखील यात भूमिका आहे.

सई ताम्हणकरने नुकतीच एका मुलाखतीत लग्न, नातं यावर चर्चा केली. तिला आयुष्यात कधी स्थिरावायचं आहे, तिच्यासाठी लग्न म्हणजे काय यावरही तिने मनमोकळेपणाने मत मांडलं.

'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली, "लग्न ही खूप मोठी जबाबदारी आहे. रोज यासाठी काम करावं लागतं. मी अजूनही लग्नाकडे कशी पाहते हे मला माहित नाही. मला माझ्या व्यापातून या गोष्टींकडे वेळ द्यायला जमलं नाही.

"आता जमाना बदलला आहे. वेगवेगळ्या प्रकारची लग्न, रिलेशनशिप आता आहेत. हे बरोबर की चूक यात न घुसता आता ते स्वीकारायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचे पॉइंट ऑफ व्ह्यूज वेगळे असतात. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आपण त्याचा आदर केला पाहिजे. इतकी वर्ष चालत आलेली ही संस्था आहे म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असावं."

"मला आयुष्यभर एकटीला राहायलाही आवडणार नाही. मी खूप लाघवी, कुटुंब हवी असणारी मुलगी आहे पण या स्टेजला मला लग्न करायचंय का? तर नाही."

मी भावनिकरित्या स्थिरावण्याचा विचार केला आहे. पण मी एका जागी स्थिरावणारी व्यक्ती नाही. मी शांत बसू शकत नाही असा माझा स्वभाव आहे. सध्या त्यासाठी काही प्रयत्न नाही सुरु आहेत. असं वाटतं काही महिन्यांनंतर प्रयत्न सुरु करेन.

नात्यात पारदर्शकता, आदर, स्वातंत्र्य असणं फार महत्वाचं वाटतं. एका पार्टनरने दुसऱ्याला विचारलं की मला सोलो ट्रिपला जायचंय. दुसरी व्यक्ती विचारते का? तर ही का विचारणारी व्यक्ती मला नकोय. म्हणून मी थांबलेय असं मला वाटतं. या गोष्टी असल्या तर नातं आणखी फुलतं, बहरतं.

सईचा २०१५ साली घटस्फोट झाला. काही वर्षांपूर्वीच ती अनिश जोगसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुलीही दिली. मात्र सईने अद्याप लग्न केलेलं नाही. तिचं ब्रेकअप झालं आहे का अशीही चर्चा झाली. सध्या नातं कॉम्प्लिकेटेड आहे असं ती म्हणाली.