weird choices of bollywood stars PSC
या कलाकारांच्या सवयी आहेत अतिशय विचित्र, वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 03:35 PM2020-03-17T15:35:29+5:302020-03-17T15:44:21+5:30Join usJoin usNext आपल्यातील अनेकांना बसल्या बसल्या नखे खायची सवय असते. अशीच सवय बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरला आहेत. तिला अनेकवेळा नखे खाताना पाहाण्यात आले आहे. सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. त्याला प्रचंड लोकप्रियता असून त्याचे सगळेच चित्रपट हिट होतात. तुम्हाला माहीत आहे का, साबण गोळा करण्याची सलमानला आवड आहे. शाहरुख खानला जीन्स, व्हिडिओ गेम्स यांची प्रचंड आवड आहे. शाहरुखकडे हजारोंहून अधिक जीन्स असल्याचे म्हटले जाते. एवढेच नव्हे तर त्याच्याकडे अनेक व्हिडिओ गेम असून त्याला वेळ मिळतो, त्यावेळी तो आवर्जून व्हिडिओ गेम खेळतो. सनी लियोनीला सतत तिचे पाय धुण्याची सवय आहे. ती कामात कितीही व्यग्र असली तरी त्यातून वेळ काढून ती तिचे पाय धूते. तिची ही सवय तिच्या जवळच्या अनेक लोकांना माहीत आहे. अमिताभ बच्चन कधी कधी दोन घड्याळ घालतात. अमिताभ यांनी अशाप्रकारे दोन घड्याळं घालण्यामागे एक खास कारण असते. अमिताभ यांच्या कुटुंबियातील कोणताही सदस्य देशाच्या बाहेर गेला असेल तर ते दुसरे घड्याळ घालून त्या देशातील वेळाप्रमाणे ते सेट करतात. जेणेकरून त्या देशात सध्या वेळ काय आहे हे त्यांना कळते.टॅग्स :शाहरुख खानकरिना कपूरसलमान खानअमिताभ बच्चनसनी लिओनीShahrukh KhanKareena KapoorSalman KhanAmitabh BachchanSunny Leone