कोण आहे आमिर खानचा होणारा मराठमोळा जावई नुपूर शिखरे, अभिनय नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 04:08 PM2022-09-23T16:08:02+5:302022-09-23T16:11:34+5:30

Aamir Khan's Daughter Ira Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक आयरा खान सातत्याने चर्चेत येत असते.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक आयरा खान सातत्याने चर्चेत येत असते. आयराने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने नुपूरसोबत साखरपुडा केल्याची घोषणा केली. नुपूरने अतिशय फिल्मी अंदाजात तिला प्रपोज केले. दोघांनीही आयुष्याचा प्रवास एकत्र घालवण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे.

या सगळ्यात बऱ्याच जणांना प्रश्न पडत आहे की, नुपूर शिखरे कोण आहे? नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर आहे. त्याने फिटनेसनिज्मची सुरुवात केली. इतकेच नाही तर तो फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणूनही ओळखला जातो.

नुपूर खूप आधी आयरालाही प्रशिक्षण देत होता. विशेष म्हणजे नुपूरने आयराचे वडील आणि सुपरस्टार आमिर खान यालाही प्रशिक्षण दिले आहे. आमिर खान आणि आयरा खान व्यतिरिक्त नुपूरने सुष्मिताला जवळपास दशकभर प्रशिक्षण दिले आहे.

२०२० च्या लॉकडाऊनमध्ये आयराने तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. नुपूर तिला प्रशिक्षण देत होता. ट्रेनिंग दरम्यानच नुपूर आणि आयरा यांच्यात जवळीक वाढली आणि दोघांनी डेट करायला सुरुवात केली.

फिटनेस ट्रेनर असण्यासोबतच नुपूर डान्सरदेखील आहे. त्याने अनेकवेळा त्याचे डान्सचे व्हिडिओ शेअर केले आहेत. आयराने २०२१ मध्ये ती नुपूरसोबत नात्यात असल्याचं जाहीर केले होते.

आयराने तिचा पहिला टॅटू नुपूरच्या हातावरच काढला होता. तो एक अँकर होता. तिच्या कलेवर विश्वास ठेवल्याबद्दल स्टारकिडने नुपूरचे आभारही मानले होते.

नुपूर आणि आयरा एकमेकांच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहेत. २०२० मध्ये आमिर खान आणि किरण राव यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला दोघेही एकत्र उपस्थित होते असे सांगितले जाते. ही पार्टी गिर राष्ट्रीय उद्यानात देण्यात आली होती. यावेळी मोजक्या आणि जवळच्या लोकांनाच आमिर तिथे घेऊन गेला होता. कुटुंबातील एक सदस्य म्हणून खान कुटुंबात नुपूरही होता.

इतकेच नाही तर दोघे आयराचा चुलत भाऊ जैन खानच्या लग्नात आणि विधींमध्येही एकत्र दिसले होते. यावेळी आयराने तिची आई रीना दत्तशी नुपूरची ओळख करुन दिली असेही सांगितले जात आहे.

गेल्यावर्षी इरा आणि नुपूर यांनी दिवाळी आणि नाताळ असे दोन्ही सण एकत्र साजरे केले होते. नुपूर आणि आमिरने तर नाताळला एकसारखे पोशाख दिसले होते

आयरा नुपूरसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर शेअर करत असते.