Irina Rudakova Bigg Boss Marathi: फॉरेनची पाहुणी! बिग बॉस मराठीच्या घरात आलेली परदेशी इरिना रुडाकोवा कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 00:13 IST2024-07-28T23:59:07+5:302024-07-29T00:13:03+5:30
Bigg Boss Marathi: IPL मधील चिअर लीडर ते 'बिग बॉस मराठी'चे घर ... असा आहे इरिनाचा प्रवास

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा आज ग्रँड प्रीमिअर पार पडला. 'लय भारी' रितेश देशमुख पहिल्यांदाच बिग बॉस होस्ट करत आहे. टीव्ही कलाकार ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला.
वर्षा उसगांवकर असो किंवा हिंदीतली निक्की तांबोळी, कोकण हार्टेड गर्ल ते अहमदनगराचा छोटा पुढारी, इंडियन आयडॉलच्या सीझन १ चा मराठमोळा विजेता अभिजीत सावंत अशा एकापेक्षा एक स्पर्धकांनी घरात एन्ट्री घेतली आहे. यंदाचा सीझन धमाकेदार होणार यात शंका नाही.
दरम्यान या सर्व स्पर्धकांमध्ये फॉरेनच्या पाहुणीने सर्वांचंच लक्ष वेधलं. बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका परदेशी पाहुणीने शोमध्ये सहभाग घेतला आहे. ही कोण आहे याची उत्सुकता सर्वांनाच होती. याचा खुलासा आज प्रीमिअरमध्ये झाला.
ही परदेसी गर्ल आहे मॉडेल, अभिनेत्री इरिना रुडाकोवा (Irina Rudakova). इरिनाने मस्त डान्स परफॉर्मन्स देत आधी सर्वांचं मनोरंजन केलं. नंतर रितेशसमोर आणि घरातील स्पर्धकांसमोर थोडंफार मराठीही बोलण्याचा प्रयत्न केला. पण ही इरिना रुडाकोवा नक्की आहे तरी कोण?
इरिना मॉडेल, अभिनेत्री आणि योग अभ्यासात पारंगत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम बायोवर मुंबईची बार्बी असंही लिहिलं आहे. इरिनाची आर्मी असा तिचा मोठा चाहतावर्गही आहे.
छोटी सरदारनी या कलर्स च्या टिव्ही शो मध्ये तिने अभिनय केला आहे. IPL 2024 मध्ये तिने चिअर लीडर म्हणून ही आपल्या डान्स चा जलवा दाखवून दिला आहे. बिग बॉस मराठी 5 हा इरिना हीचा पहिला रिॲलिटी शो आहे.
इरिनाचे इन्स्टाग्रामवर 154k फॉलोअर्स आहेत. इरिनाची आज बिग बॉसमध्ये एन्ट्री होताच आतापासूनच तिला चाहत्यांचा फुल्ल सपोर्ट मिळताना दिसतोय.