Allu Arjun Wife: कोण आहे पुष्पा सिनेमातील स्टार कलाकार अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी? फिल्मी आहे दोघांचीही लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 09:03 AM2022-02-11T09:03:58+5:302022-02-11T09:11:56+5:30

Allu Arjun Wife: दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या Pushpa या चित्रपटाने गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामुळे त्याची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या पर्सनल लाईफबाबत जाणून घेण्यासाठीही लोक उत्सुक आहेत. आज आपण जाणून घेऊया अल्लू अर्जुनची पत्नी Sneha Reddy हिच्याविषयी. या दोघांची लव्हस्टोरी ही कुठल्याही चित्रपटाच्या कथानकापेक्षा कमी नाही आहे.

दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाने गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामुळे त्याची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या पर्सनल लाईफबाबत जाणून घेण्यासाठीही लोक उत्सुक आहेत. आज आपण जाणून घेऊया अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी हिच्याविषयी. या दोघांची लव्हस्टोरी ही कुठल्याही चित्रपटाच्या कथानकापेक्षा कमी नाही आहे.

अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांच्या लव्ह स्टोरीमध्ये प्रेम, ड्रामा इमोशन असं सारं काही आहे. अनेक वर्षांपूर्वी अल्लू अर्जुन हा अमेरिकेमध्ये एका मित्राच्या लग्नात गेला होता. स्नेहासुद्धा त्या विवाहसोहळ्यामध्ये उपस्थित होती. अर्जुनच्या मित्राने त्याची स्नेहाशी ओळख करून दिली. तेव्हा पहिल्या भेटीतच अल्लू अर्जुन तिच्या प्रेमात पडला.

अल्लू अर्जुनचं हे प्रेम लव्ह अॅट फर्स्ट साईट होतं. ज्या दिवशी ते दोघे भेटले तेव्हा त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बोलणं झालं नाही. पण मनातल्या मनात अल्लू अर्जुन तिच्या प्रेमात पडला होता.

त्यानंतर अल्लू अर्जुनच्या मित्राने स्नेहाला मेसेज करण्यासाठी दबाव आणला गेला. आश्चर्याची बाब म्हणजे अल्लू अर्जुनच्या मेसेजला स्नेहाने उत्तर दिलं. त्यानंतर ते दोघेही फोनवर बोलू लागले. काही काळ फोनवर बोलल्यानंतर ते पुन्हा भेटले.

त्यांची ही भेट चांगली झाली. त्यानंतर ते अनेकदा डेटवर गेले. तसेच या भेटीगाठींमुळे त्यांना एकमेकांना चांगले समजून घेता आले. मग दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातील त्यांनी हे नातं लपवून ठेवलं होतं.

काही वर्षे डेटिंग केल्यानंतर अल्लू अर्जुनच्या वडिलांना या नात्याची कुणकुण लागली. वडिलांनी विचारणा केल्यावर अल्लू अर्जुनने स्नेहावर त्याचं प्रेम असल्याचं मान्य केलं. तसेच तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

स्नेहा रेड्डी ही व्यावसायिक के.सी. शेखर रेड्डी आणि कविता रेड्डी यांची कन्या आहे. सुरुवातीला दोघांचीही कुटुंब या विवाहाला राजी नव्हते. मात्र अल्लू अर्जुन आणि स्नेहा ठाम राहिले. अखेरीस कुटुंबांना झुकावे लागले. त्यानंतर दोघांचाही विवाह सोहळा पार पडला.

२६ नोव्हेंबर २०१० रोजी अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर ६ मार्च २०११ रोजी त्यांनी लग्न केलं. त्यांचा हा विवाह सोहळा अनेक टीव्ही चॅनल्सवर दाखवला गेला होता.

लग्नाला अनेक वर्षे झाल्यानंतरही या दोघांमधील प्रेम हे पूर्वीप्रमाणेच आहे. अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. सोशल मीडियावर या कुटुंबाचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.

अल्लू अर्जुनप्रमाणेच त्याची पत्नी स्नेहा ही सुद्धा सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल ७.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ती पेशाने व्यावसायिक असून, वडिलांच्या इन्स्टिट्युट ऑफ सायंटिफिक टेक्नॉलॉजीची चेअरमन आहे.