अमिताभ बच्चन की संजय दत्त कोणाच्या नावाचा सिंदूर लावतात रेखा ? जाणून घ्या या मागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 06:04 PM2021-05-26T18:04:46+5:302021-05-26T18:23:29+5:30

बॉलिवूड दिवा रेखा यांच घायाळ करणा-या सौंदर्ययाची जादू आजही रसिकांवर कायम आहे. मग हीच जादू त्यांच्यासोबत काम केलेल्या त्यांच्या सहकलाकारांवर झाली नसती तरच नवल. रेखा यांच्या सौंदर्यावर त्यांचे अनेक सहकलाकार फिदा झाले. त्यामुळेच कित्येक कलाकारांशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं.

गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय, चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांच्या अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत. त्यामुळेच की काय बॉलीवुड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे.

रेखा यांचं व्यावसायिक जीवन जितकं गाजलं तितकंच त्याचं खासगी जीवन वादग्रस्त ठरलं. त्यांच्या खासगी जीवनाविषयी कुणालाच फारसं माहित नाही. प्रत्येकाकडे रेखा यांच्या खासगी जीवनाविषयी उलटसुलट माहिती आहे.

सिनेसृष्टीतील ज्या ज्या नायकाशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं तो प्रत्येक नायक रेखा यांचं मन दुखावून त्यांच्यापासून दूर गेला. आजही रेखा यांचा एकाकी जीवनप्रवास सुरु आहे.

महानायक आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर असलेलं प्रेम त्या कधीच लपवू शकल्या नाहीत हेही उघड सत्य आहे. बिग बींवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं आणि किंबहुना आहे. मात्र हे वास्तव त्यांनी आजवर कधीही स्वीकारलं नाही.

अमिताभच नाही तर कित्येक कलाकारांशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं. एकेकाळी रेखा याचं संजय दत्तसोबतही अफेअर असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. रेखा आणि संजय दत्त एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.

एवढेच नव्हे तर त्यांनी लपून छपून लग्न केले होते अशी चर्चा त्याकाळात मीडियात गाजली होती.रेखा आणि संजय 'जमीन आस्मान' या सिनेमात काम करत होते. त्यावेळी या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी लग्न केले अशाही जोरदार चर्चा रंगल्या.

संजय दत्त रेखा यांच्या लग्नाची चर्चा ऐकून सुनिल दत्त यांनी देखील संजय दत्तला रेखापासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. संजय दत्तने सुनिल दत्त यांचे काही ऐकले नाही. शेवटी सुनिल दत्त यांनीच रेखाला संजयपासून लांब राहण्यास सांगितले होते.

संजय दत्तने तीन लग्नं केली आहेत. पण त्याने तीन नव्हे चार लग्न केली असून पहिले लग्न रेखा यांच्यासोबत केले इतकेच नाही तर रेखा संजय दत्तच्याच नावाचा सिंदूर लावतात अशीही अफवा पसरली होती.

रेखा: द अनटोल्ड स्टोरी या बायोग्राफीमध्ये संजय आणि रेखा यांच्या नात्यावर लिहीले गेल्यामुळे त्यांच्या लग्नावरच फार काळ चर्चा रंगल्या होत्या. पण या पुस्तकाचे लेखक यासीर उस्मान यांनीच दोघांच्या नात्यावर खुलासा केला होता.

एका मुलाखतीत सांगितले होते की, अशा कोणत्याही गोष्टीचा या पुस्तकात उल्लेख करण्यात आलेला नाहीये. लोकांनी पुस्तक व्यवस्थित वाचलेले नाहीये असे मला वाटते.