'सबसे कातील गौतमी पाटील' असं का म्हटलं जातं?, खुद्द गौतमीनेच दिलं उत्तर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 11:45 AM2023-05-17T11:45:19+5:302023-05-17T11:57:32+5:30

Gautami Patil : गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहे. गौतमी पाटीलचे चाहते सबसे कातील गौतमी पाटील असं म्हणत असतात.

गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहे. गौतमी पाटीलचे चाहते सबसे कातील गौतमी पाटील असं म्हणत असतात.

मात्र सबसे कातील गौतमी पाटील असं का म्हटलं जातं? या प्रश्नाचं उत्तरही गौतमीने दिलं आहे.

त्यावर गौतमी म्हणाली की, सबसे कातील गौतमी पाटील असं माझ्याविषयी म्हटले जाते हे प्रेक्षकांचे प्रेम आहे. मला या गोष्टीचे खूप समाधान वाटते, छान वाटते. माझ्या कार्यक्रमांना आता महिला वर्गही येऊ लागला आहे याचेही बरे वाटते.

ती पुढे म्हणाली की, प्रेक्षकांनी मला प्रेम दिलं. सबसे कातील गौतमी पाटील असं माझ्याविषयी कायमच ते बोलत असतात. हे सगळं माझ्याविषयीच्या प्रेमापोटीच. या प्रेक्षकांनीच मला इथपर्यंत आणलं आहे. हे त्यांचेच उपकार आहेत.” असं म्हणत गौतमीने याबाबत उत्तर दिलं आहे.

राजकारणात येणार का असं विचारल्यावर गौतमी म्हणाली की, मला कुठल्याही राजकारणात यायचं नाही. मी कलाकार आहे. मी माझी कला सादर करत राहणार आहे.

तसेच गौतमीने प्रेक्षकांनाही महत्त्वाचे आवाहन केले. “माझं सगळ्या प्रेक्षकांना एवढंच सांगणं आहे की, तुम्ही एवढ्या लांबून माझ्या कार्यक्रमाला येत असतात, तुमचं माझ्यावर प्रेम आहे. माझं एकच म्हणणं आहे, प्रत्येक कार्यक्रमाला वाद होत नाहीत. थोडंफार होतं. पण ते पुढे वाढवलं जातं. त्यामुळे काहीतरी चर्चा होते.

कार्यक्रमाला या, कार्यक्रम एन्जॉय करा आणि शांतपणे घरी, असं आवाहन गौतमी पाटील हिने केलं.

गेल्या काही दिवसांपासून मी पाहते आहे की माझ्यावरुन वाद होतात. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या प्रत्येक कार्यक्रमावरून वाद होत नाही. काहीतरी छोटं-मोठं घडतं. ते वाढवून वाढवून सांगितलं जातं, असे ती म्हणाली.

बार्शीतही माझ्यावर हा आरोप केला गेला आहे की मी वेळेत गेले नाही. मात्र तसं नाही मी वेळेत गेले होते. फक्त ते सगळं प्रकरण मी समजून घेईन आणि मगच त्याबाबत बोलेन असंही गौतमीने सांगितलं. तसंच लग्न करण्याचा इतक्यात तरी काही विचार नाही असंही गौतमी पाटीलने स्पष्ट केलंय.