'गौतमी पाटीलची प्रत्यक्षात भेट घेणार अन्..'; पुढारी छोटा पण बाता मोठ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 05:55 PM2023-05-29T17:55:07+5:302023-05-29T18:04:23+5:30

लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील आणि महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांच्या चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील आणि महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांच्या चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

घनश्याम दरोडे याचा मुसंडी नावाचा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असताना, पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना घनश्यामने गौतमी पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला होता.

महाराष्ट्राचा बिहार करू नका, अशा शब्दात गौतमी पाटीलला सुनावलं होतं. त्यावर, तुम्हाला मीच दिसते का, असा प्रतिसवाल गौतमीने केला होता. त्यानंतरही दरोडे आणि पाटील यांच्यातील वाद सुरूच आहे. आता घनश्याने गौतमीची भेट घेणार असल्याचे म्हटले,

मी प्रत्यक्षात गौतमी पाटील यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्राच्या वतीने त्यांना समजून सांगणार आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटूनच महाराष्ट्राच्या बाहेर जायला सांगणार आहे.

गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये, बिहारमध्ये जाऊन क्या धिंगाणा-मस्ती घालायची आहे ती तिकडं करा, अशा शब्दात छोटा पुढारी घनश्याम दरोडे याने गौतमी पाटील यांच्यावर पुन्हा एकदा टीका केलीय.

तसेच, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र कसा आहे, हे आमच्या सिनेमातून तुम्ही पाहा, असेही म्हटले आहे.

गौतमीताईंचा एकही कार्यक्रम नीटनीटका होत नाहीत. आजपर्यंत गौतमीताईंच्या कार्यक्रमाला पोलीस संरक्षण देत होते. आता, पोलिसांना संरक्षण द्यावं लागत आहे.

तुमच्या अदांमुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गाला जात आहे, जनतेला काहीतरी चांगलं द्यायचा प्रयत्न करा, असेही घनश्याम दरोडे याने म्हटले आहे.

दरम्यान, 'मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का?, असे गौतमीने यापूर्वी म्हटले होते.

माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?', असा प्रतिसवाल गौतमी पाटीलने या अगोदर घनश्याम दरोडे यांस केला होता.