नारीशक्ती! करीना ते दीपिका...; ग्लॅमरच्या दुनियेतील 'या' अप्सरा खऱ्या आयुष्यात बिझनेसवुमन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 01:13 PM2024-03-08T13:13:46+5:302024-03-08T13:22:39+5:30

Womens Day 2024 : आज महिला दिनाबद्दल अशाच बिझनेसवुमनबद्दल जाणून घेऊया...

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या दमदार अभिनयासोबतच व्यवसायाची धुरा अत्यंत व्यवस्थित सांभाळत आहेत. आज महिला दिनाबद्दल अशाच बिझनेसवुमनबद्दल जाणून घेऊया...

अभिनयासोबतच दीपिका पादुकोण स्वतःचं ऑनलाईन क्लोजेट चालवते. याशिवाय ती मेंटल हेल्थ ऑर्गनायझेशन आणि क्लोदिंग ब्रँडसोबतही सतत काम करत आहे.

प्रियंका चोप्राने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत राज्य केले आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती स्वतःचा हेअरकेअर ब्रँड, प्रॉडक्शन हाऊस आणि इतर व्यवसाय करत आहे.

अनुष्का शर्मा इंडस्ट्रीतील मोठं नाव असण्यासोबतच दोन मुलांची आई आहे. याशिवाय ती तिचे प्रोडक्शन हाउस क्लीन स्लेट फिल्म्स आणि कपड्यांचा ब्रँड देखील चालवत आहे.

अभिनयासोबतच आलिया भट स्वतःचं प्रोडक्शन हाऊसच चालवते आणि क्लोदिंग ब्रँड Ed-a-Mamma सोबतही काम करत आहे.

करीना कपूर खान सध्या चित्रपटांमध्ये कमाल करत आहे. ती कोरियन स्किनकेअर ब्रँड Quench Botanics शी पार्टनर म्हणून जोडली गेलेली आहे.

क्रिती सेननही चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच ती तिचा स्किनकेअर ब्रँड हायफन आणि प्रोडक्शन हाऊस चालवत आहे.

मलायका अरोरा चित्रपटांमध्ये दिसण्यासोबतच टीव्ही रिॲलिटी शोची जज आहे. याशिवाय ती फिटनेस आणि योगा स्टुडिओ चालवते. सुपरमॉडेल असलेल्या मलायका हिचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील आहे.

परिणीती चोप्रा देखील मल्टीटास्कर आहे. अभिनयासोबतच परिणीतीने सिंगिग क्षेत्रातही प्रवेश केला आहे. याशिवाय ती स्किनकेअर ब्रँड क्लेन्स्टासोबत जोडलेली आहे.