याई रे याई रे...म्हणत सोनाली कुलकर्णीनं दिल्या ‘रंगीला’ स्टाईल पोझ, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 05:33 PM2022-06-08T17:33:02+5:302022-06-08T17:37:24+5:30

Sonalee Kulkarni : सध्या चर्चा आहे ती सोनालीच्या नव्या फोटोशूटची. होय, सोनालीने नवे स्टनिंग फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला रंगीला गर्ल उर्मिलाची अगदी हटकून आठवण येईल.

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून जाम चर्चेत आहेत. होय, कधी तिच्या सिनेमाची चर्चा, कधी तिच्या लग्नाची चर्चा तर कधी तिच्या फोटोंची चर्चा.

सध्या चर्चा आहे ती सोनालीच्या नव्या फोटोशूटची. होय, सोनालीने नवे स्टनिंग फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला रंगीला गर्ल उर्मिलाची अगदी हटकून आठवण येईल.

नव्या फोटोशूटमध्ये सोनालीने रंगीला स्टाईलमध्ये पोझ दिल्या आहेत. एक एक पोझ भारी आहे. याई रे याई रे... जोर लगाके नाचे रे... असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

सोनालीचं हे फोटोशूट सध्या चांगलेच चर्चेत आहे. चाहत्यांना देखील सोनालीचा हा स्टटिंग लुक भलताच आवडलेला दिसत आहे.

सोनाली मागच्या काही दिवसांपासून तिच्या हनिमून फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनालीचा हनिमून स्पेशल बिकीनी लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

सोनालीने नुकतंच पती कुणालसोबत पुन्हा विधिवत लग्न केलं. गेल्या 7 मे रोजी तिच्या व कुणालच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं. या निमित्तानं दोघांनी विधिवत लग्न केलं.

गतवर्षी 7 मेला दुबईत सोनाली व कुणाल लग्नबंधनात अडकले होते. मात्र कोरोना महामारीमुळे या लग्नाला तिचे कुटुंबीय उपस्थित राहू शकले नव्हते.