PHOTOS : हळद, मेहंदी ते विवाह...! पाहा, यामी गौतमचा वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 01:15 PM2021-06-06T13:15:02+5:302021-06-06T13:32:21+5:30

Yami Gautam : पाहा अभिनेत्रीच्या संपूर्ण विवाह सोहळ्याचे Photo, या लूकमध्ये दिसली प्रचंड सुंदर

अभिनेत्री यामी गौतमने ४ जून रोजी अचानक विवाहाची बातमी देत सगळ्यांनाच आनंदाचा धक्का दिला होता.

यामी 4 जूनला आदित्य धर याच्यासोबत गुपचूप लग्नबंधनात अडकली. या विवाह सोहळ्याचा पहिला फोटो समोर आल्यानंतर या लग्नाबद्दल सर्वांना कळले होते.

आता यामीने तिच्या विवाह सोहळ्यांचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत.

लॉकडाऊनमुळे अगदी 18 लोकांच्या उपस्थितीत यामीने लग्नगाठ बांधली. हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर येथे यामीचा विवाहसोहळा पार पडला.

यामीचा पती आदित्य धर हा दिग्दर्शक व गीतकार आहे. आदित्यने काबूल एक्सप्रेस, हाल ए दिल यांसारख्या चित्रपटांची गाणी लिहिली आहेत तर उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे.

नवीन वधूच्या रूपात दिसत आहे. साडी, सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात बांगड्या परिधान केलेली यामी खूप सुंदर दिसत आहे.

यामी आणि आदित्यनं आपलं नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. दोघांनाही एकमेकांवर प्रेम आहे हे कुणालाही कळू दिलं नाही.

यामी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी बोलत नाही आणि यामुळेच यामी आणि आदित्यच्या लग्नामुळे केवळ चाहतेच नव्हे तर सेलेब्रिटींनाही धक्का बसला.

या फोटो यामी होणा-या पतीकडे बघून हसतेय. यात ती कमालीची सुंदर दिसतेय.

हळदीचा एक फोटो यामीने शेअर केला आहे. यात ती खळखळून हसताना दिसतेय.

मेहंदीमध्ये यामीनं गडद पिवळ्या रंगाचा शेड सूट परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. या सोहळ्यात आदित्यही यामीबरोबर होता.