Year Ender 2021: कुणी 15 वर्षांचा संसार मोडला तर कुणी 5 वर्षाचा, सरत्या वर्षात या सेलिब्रेटींना घेतला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 11:13 AM2021-12-18T11:13:16+5:302021-12-22T12:38:01+5:30

2021 मध्ये इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. कोरोना महामारीमुळे चित्रपटसृष्टीचा वेग मंदावला असताना, अनेक चित्रपट वर्ष संपता संपता थिएटरमध्ये रिलीज झाले. गेल्या काही दिवसांपासून अनेक स्टार्स लग्नाच्या बेडीत अडकले तर काही विभक्त झाले. काही सेलिब्रिटींच्या घटस्फोटाची बातमी धक्कादायक होती. आमिर खान (Aamir Khan) किरण राव(Kiran Rao), समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांसारख्या स्टार्सच्या डोव्हर्स झाल्याची बातमी हैराण करणारी होती. पेज 3 चित्रपटातील कितने अजीब रिश्ते है यहाँ पे या गाण्याने खऱ्या अर्थाने बॉलिवूड जगातील नातेसंबंधावर प्रकाश टाकणार आहे असे म्हटलं तर वावगे ठरायला नको.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, जो सहसा सोशल मीडिया आणि लाइम-लाइटपासून दूर राहतो, ज्यावेळी आमिरने किरण रावसोबत असलेले त्याचं नातं सपवंत असल्याचे सांगितले तेव्हा चाहत्यांना धक्का बसला होता. 15 वर्षांच्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यात दोघे आनंदी आहेत एकमेकांसोबत फिरतायेत. दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे असेच मानले जात होते. दोघांनी एक संयुक्त निवेदन देऊन त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. (फाइल फोटो)

असेच काहीसे झाले जेव्हा साऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या विभक्त झाल्याची बातमी समोर आली.बर्‍याच दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत होत्या. सामंथा आणि रुथ यांनी 2017 मध्ये लग्न केले आणि याच वर्षी दोघे विभक्त झाले. (फाइल फोटो)

अभिनेत्री आणि राजकारणी नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचे वैवाहिक आयुष्यही केवळ 2 वर्षे टिकले. परदेशात लग्न केल्यानंतर दोघांनी कोलकाता येथे रिसेप्शन दिले होते, ज्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता मुखर्जी यांच्यासह अनेक प्रसिद्ध राजकारणी आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण नुसरत यांनी त्यांचा विवाह अवैध ठरवला.. (फाइल फोटो)

5 वर्षे आनंदी वैवाहिक जीवन व्यतीत केल्यानंतर अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिने यावर्षी पती साहिल सेहगलसोबत वेगळे केले. 2016 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. (फाइल फोटो)

टीव्ही अभिनेत्री निशा रावलने तिचा पती अभिनेता करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला तेव्हा चाहत्यांना धक्का बसला होता. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करणची प्रतिमा शांत पुरुषाची होती, मात्र निशाने करणवर मारहाणीचा आरोप केला आणि त्याच्यावर दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचा आरोपही केला. (फाइल फोटो)

प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंगवर ही पत्नी शालिनी तलवारने घरगुती हिंसाचाराचा आरोप करत संबंध संपवले. हनी सिंग आणि शालिनी तलवारच्या बातम्याही चर्चेत राहिल्या. हृदेश सिंग उर्फ ​​यो यो हनी सिंग आणि तलवार यांनी 23 जानेवारी 2011 रोजी लग्नगाठ बांधली होती. (फाइल फोटो)