बिग बॉस मराठी गाजवल्यानंतर योगिता चव्हाण सध्या काय करतेय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 14:48 IST2024-08-29T14:18:45+5:302024-08-29T14:48:55+5:30
बिग बॉस मराठी गाजवल्यानंतर योगिता चव्हाण सध्या काय करतेय? जाणून घ्या

अभिनेत्री योगिता चव्हाण बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी होती. योगिताचा प्रवास तीन आठवड्यात संपला असला तरीही कमी वेळात योगिताने सर्वांच्या मनावर राज्य केलं
योगिता चव्हाणने बिग बॉसच्या घरात कॅप्टनसीमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवत अंकिता वालावलकरला कॅप्टन केलं
योगिता चव्हाणला बिग बॉसच्या घरात खूप मानसिक त्रास होत असल्याने तिने बिग बॉसकडे घराबाहेर जाण्याची विनंतीही केलेली दिसली
तिसऱ्या आठवड्यात डबल एविक्शन झालं आणि योगिता अन् निखिल दामलेला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं
योगिता बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यावर काय करतेय असा प्रश्न सर्वांना पडलाय. योगिता बिग बॉसमधून बाहेर आल्यावर दोन दिवसांपूर्वी दहीहंडी उत्सवात दिसली.
योगिताने सध्यातरी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला असून तिच्या नवीन प्रोजेक्टची सर्वांना उत्सुकता आहे
योगिता आणि तिचा पती सौरभ चौगुले या दोघांना जीव माझा गुंतला मालिकेनंतर एकत्र बघण्यासाठी त्यांचे चाहते आतुर असतील यात शंका नाही