'कॉकटेल' क्वीन डायना पेंटीच्या अदा पाहून तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 20:44 IST2019-04-05T20:41:56+5:302019-04-05T20:44:41+5:30

बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटी 'हॅप्पी फिर भाग जायेगी' चित्रपटानंतर कोणत्याही प्रोजेक्टला घेऊन चर्चेत आली नाही. मात्र नुकतीच ती ग्लॅमरस अंदाजात मुंबईतील वांद्रे येथे दिसली.
'हॅप्पी फिर भाग जायेगी' चित्रपटात डायनासोबत सोनाक्षी सिन्हा, जिमी शेरगिल, अली फजल, जस्सी गिल व पियूष शर्मा मुख्य भूमिकेत होते.
मुदस्सर अजीज दिग्दर्शित 'हॅप्पी फिर भाग जायेगी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही.
यापूर्वी डायना 'परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण' चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहमसोबत झळकली होती.
डायनाने आपल्या करियरची सुरूवात मॉडेेलिंगपासून केली होती. मॉडेलिंग क्षेत्रात ती खूप प्रसिद्ध आहे.
डायनाने २०१२ साली 'कॉकटेल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
या चित्रपटात डायना सोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण व सैफ अली खान मुख्य भूमिकेत होते.
'कॉकटेल'मधील डायनाच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती.