'पीछे तो देखो' फेम अहमद शाहने सोनू सूदला पाठवला क्यूट मेसेज, व्हिडीओ झाला व्हायरल...
By अमित इंगोले | Published: September 30, 2020 11:16 AM2020-09-30T11:16:42+5:302020-09-30T11:16:58+5:30
पाकिस्तानमधील लोकप्रिय मुलगा 'पीछे देखो पीछे' फेम अहमद शाहने सोनू सूदसाठी एक खास मेसेज पाठवला आहे.
बॉलिवूड सध्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आहे. अनेक कलाकार वेगवेगळ्या वादांवर आपली मते मांडून प्रकाशझोतात येत आहेत. तर काही ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. अशात अभिनेता सोनू सूद त्याच्या समाजकार्यामुळे देश-विेदेशात चर्चेचा विषय ठरत आहे. सोनू सूद सध्या देशातील सर्वात मोठा हिरो ठरत आहे. केवळ देशातच नाही तर शेजारी देश पाकिस्तानमध्येही त्याच्या कामाची चर्चा सामान्य झाली आहे. पाकिस्तानमधील लोकप्रिय मुलगा 'पीछे देखो पीछे' फेम अहमद शाहने सोनू सूदसाठी एक खास मेसेज पाठवला आहे.
जगभरातील लोकांना 'पीछे तो देखो' म्हणत फेमस झालेला हा मुलगा अहमद शाह सर्वांनाच माहीत आहे. अहमदचे अनेक व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियात व्हायरल होतात. त्याने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अहमदने अभिनेता सोनू सूदसाठी एक क्यूट मेसेज पाठवला आहे.
अहमदचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. ज्यात अहमद म्हणतो आहे की, 'हाय सोनू सूद सर, कसे आहात? मी सुद्धा ठीक आहे. मी अहमद शाह आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप प्रेम, तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. आय लव्ह यू. आनंदी रहा'. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अहमद शाह हा पाकिस्तानातील एक पठाणी मुलगा असून त्याच्या पीछे देखो पीछे या व्हिडीओने सोशल मीडियावर धमाका केला होता. अहमदच्या या एका व्हिडीओने त्याला रातोरात सोशल मीडिया स्टार बनवलं होतं. त्यानंतर त्याला अनेक जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आता त्याला घराघरात ओळखलं जातं.
दरम्यान, सोनू सूदने लॉकडाऊनपासूनच गरजू, प्रवासी मजुरांची मदत करणे सुरू केले. त्यानंतर तो या लोकांसाठी देवदूत बनला आहे. सोनूने आतापर्यंत गरीब आणि निराधा लोकांची भरभरून मदत केली. त्याच्या या कामाचं भरभरून कौतुकही करण्यात आलं. या कामानिमित्त यूएनकडून त्याला प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सोनू सूदला संयुक्त राष्ट्र संघाने SDG Special Humanitarian Action Award या पुरस्कारान सन्मानित केलं.