'मुंज्या'चे पात्र साकारणे आव्हानात्मक होते, शर्वरीने सांगितला सिनेमाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 07:47 PM2024-07-03T19:47:18+5:302024-07-03T19:50:45+5:30

Sharvari : ‘मुंज्या’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार करून ब्लॉकबस्टर ठरला आहे.

‘मुंज्या’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार करून ब्लॉकबस्टर ठरला आहे. मुंज्या बनण्याच्या अनुभवाविषयी शर्वरी म्हणते, “मी खूप उत्साहित होते. हे रोमांचक आणि निश्चितच आव्हानात्मक होते.

पहिल्या दिवशी मी खूप नर्वस होती, कारण मला मुंज्या म्हणून सेटवर जावे लागले. जेव्हा मुंज्या शारीरिक रूप घेतो, तेव्हा मी होते, त्यामुळे हे आव्हानात्मक होते. माझ्या मते, हा एक विलक्षण अनुभव होता., असे शर्वरी सांगते.

ती पुढे म्हणाली, “माझं काम लोकांना घाबरवणं होतं, पण त्याचबरोबर त्यांना हसवणं सुद्धा होतं, आणि ही भूमिका निभावण्याचा सर्वात कठीण भाग होता. प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहून मी खूप भारावले आणि आभारी आहे.”

मुंज्याच्या बॉडी लॅंग्वेजबद्दल शर्वरी म्हणाली, “चित्रपटात मुंज्या एक पूर्णतः सीजीआय पात्र आहे, त्यामुळे मी मुंज्याच्या कब्जात असताना आम्हाला संदर्भ नव्हता की मला बॉडी लॅंग्वेज कशी ठेवावी.

आमची संपूर्ण टीम, विशेषतः दिग्दर्शक आदित्य सर आणि मी, यांनी एकत्रितपणे यावर खूप काम केले. आम्ही बॉडी लॅंग्वेजवर खूप चर्चा केली आणि अनेक व्हिडिओ शूट केले जेणेकरून आम्हाला योग्य बॉडी लॅंग्वेज मिळेल आणि नंतर चित्रपटात ते प्रदर्शित करू शकेन, असे शर्वरीने सांगितले.

दिनेश विजन प्रस्तुत, ‘मुंज्या’ चे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे.

चित्रपटाची निर्मिति दिनेश विजन आणि अमर कौशिक ने केली असून हा चित्रपट ७ जून २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.