सर्वांनी बघावा असा राजकीय-सामाजिक थ्रिलरपट ‘सेटर्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:25 PM2019-04-28T12:25:13+5:302019-04-28T12:27:06+5:30
‘सेटर्स’ या थ्रिलरपटात रोजगार आणि शिक्षणक्षेत्रात होणाऱ्या गैरप्रकारांचे चित्रण केले आहे. शिक्षणक्षेत्रात २ हजार पेक्षा जास्त फसवणुकीच्या केसेस आलेल्या आहेत.
दिग्दर्शक आश्विनी चौधरी यांचा राजकीय-सामाजिक पातळीवरील थ्रिलरपट ‘सेटर्स’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. देशात लोकसभा निवडणूकीचे वातावरण असताना या चित्रपटाच्या माध्यमातून देशातील शिक्षणक्षेत्रात होणाऱ्या गैरप्रकाराचे वास्तववादी चित्रण केले आहे. आफताब शिवदासानी हा या चित्रपटातून पुन्हा एकदा इंडस्ट्रीत कमबॅक करत आहे. ‘सेटर्स’ या थ्रिलरपटात रोजगार आणि शिक्षणक्षेत्रात होणाऱ्या गैरप्रकारांचे चित्रण केले आहे. शिक्षणक्षेत्रात २ हजार पेक्षा जास्त फसवणुकीच्या केसेस आलेल्या आहेत. दिग्दर्शक आश्विनी चौधरी यांनी या वास्तववादी केसेसचा अभ्यास केला असून त्या केसेस चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.
विकाश मनी सांगतात,‘पैशाच्या बळावर तुम्ही काहीही विकत घेऊ शकता हे प्रमाण जेव्हा शिक्षणक्षेत्रात अवलंबले जाते तेव्हा शिक्षणाचा ऱ्हास तर होतोच पण, सर्वसामान्यांचा शिक्षणावरील विश्वास उडून जातो. आजही शिक्षणक्षेत्रात असे काही गैरप्रकार घडतात जे की सामान्यांना माहिती होत नाहीत. हे गैरप्रकार जर पाहायचे असतील तर नक्की ‘सेटर्स’ पाहावा.’ लव्हली फिल्म्स प्रोडक्शन आणि एनएच स्टुडिओज निर्मित ‘सेटर्स’ चित्रपटात श्रेयस तळपदे, आफताब शिवदासानी, सोनाली सेहगल, इशिता दत्ता, पवन मल्होत्रा, विजय राज, जमील खान, मनू रिशी, पंकज झा, नीरज सूद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. सलीम सुलेमान यांचे चित्रपटाला संगीत लाभलेले आहे.
'सेटर्स' चित्रपटाची कथा शिक्षण जगतातील माफियांवर आधारीत आहे. यात आफताब माफियांविरोधात लढताना दिसणार आहे. सेटर्समध्ये आफताबचा वेगळा अंदाज रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट ३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आफताबला पोलिसाच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे.