Ponniyin Selvan Movie Review :पास की फेल? कसा आहे ऐश्वर्या रॉय बच्चनचा 'पोन्नियिन सेल्वन’? सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 05:24 PM2022-09-30T17:24:36+5:302022-09-30T17:32:00+5:30

Ponniyin Selvan Movie Review : जाणून घ्या कसा आहे ऐश्वर्या रॉय बच्चनचा 'पोन्नियिन सेल्वन’ चित्रपट

Ponniyin Selvan Movie Review :Aishwarya Roy Bachchan Ponniyin Selvan Movie Review | Ponniyin Selvan Movie Review :पास की फेल? कसा आहे ऐश्वर्या रॉय बच्चनचा 'पोन्नियिन सेल्वन’? सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

Ponniyin Selvan Movie Review :पास की फेल? कसा आहे ऐश्वर्या रॉय बच्चनचा 'पोन्नियिन सेल्वन’? सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : चियान विक्रम, कार्ती, जयम रवी, ऐश्वर्या रॉय बच्चन, तृषा कृष्णन, शोभिता धूलिपाला, प्रकाश राज.
दिग्दर्शक : मणिरत्नम
श्रेणी: ॲक्शन, ड्रामा
वेळ : २ तास ४७ मिनिटे
स्टार्स : तीन स्टार
चित्रपट परीक्षण : अबोली शेलदरकर


बहुचर्चित चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन' आज चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आणि तमिळ, हिंदी प्रेक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या. या चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. तगडी स्टारकास्ट, बिग बजेट, संगीत, दिग्दर्शन या सगळ्याच बाबी चित्रपटाच्या बाबतीत जुळून आल्या आहेत. हा चित्रपट महाप्रतापी चोल राजा अरूलमोरीवर्मन यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे. ज्यांनी राजेंद्र प्रथम यांच्या नावाने चोल साम्राज्यावर राज्य केले. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल ५०० रुपयांचे बजेट लागले. १९५५मध्ये कल्कि कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या उपन्यास 'पोन्नियिन सेल्वन'वर आधारित आहे. एम. जी. रामचंद्रन यांनी ५०च्या दशकात या विषयावर चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसला. स्वत: मणिरत्नम यांनी दोनदा ही महागाथा पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला. पण, तेदेखील अपयशी ठरले. अखेर त्यांनी २०१९मध्ये या चित्रपटावर काम करायला सुरूवात केली. ‘पोन्नियिन सेल्वन’ या शीर्षकाचा अर्थ पोन्नी (कावेरी) चा मुलगा असा होतो.

कथानक : एक हजार वर्षांपूर्वी चोल साम्राज्यावर दिसलेल्या धुमकेतूमुळे पंडितांनी काहीतरी अघटित घडणार आहे, अशी भविष्यवाणी केली. त्यामुळे काळजीवाहू असलेले चोल सम्राट सुंदर चोल (प्रकाशराज) हे अस्वस्थ असतात. त्यांचा मोठा मुलगा आदित्य करिकलन (चियन विक्रम) हा राष्ट्रकुटांसोबत लढाई करत असतो. त्याचवेळी लहान मुलगा अरूलमोरीवर्मन (जयम रवी) हा सिंहल द्वीप म्हणजेच श्रीलंकेसोबत युद्ध करत असताे. आदित्यची जुनी प्रेयसी नंदिनी (ऐश्वर्या रॉय बच्चन) आता चोल सेनापती पर्वतेश्वरची पत्नी बनून साम्राज्याच्या मुळांना धक्का देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा राजाची मुलगी राजकुमारी कुंधवई (त्रिशा कृष्नन) आपल्या वडिलांच्यासोबत राज्यातील षडयंत्राचा सामना करण्यात व्यस्त आहे. आदित्यचा मित्र वंध्यवन (कार्थी) हा देखील साम्राज्याला वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे. या सगळयात आता कोण यशस्वी होणार? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघावाच लागेल.

लेखन व दिग्दर्शन : मणिरत्नम यांनी जेव्हा 'पोन्नियिन सेल्वन' चित्रपट बनवला, तेव्हा याला तमिळ चित्रपटाकडून तेलुगू सुपरहिट चित्रपट ‘बाहुबली’साठी उत्तर मानले गेले. मात्र, या चित्रपटाची तुलना ‘बाहुबली’ चित्रपटासोबत करणे योग्य होणार नाही. कारण 'पोन्नियिन सेल्वन' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून ‘बाहुबली’ चित्रपट काल्पनिक कथा आहे. हिंदी व्हर्जनमधील चित्रपटाची सुरूवात बॅकग्राऊंडला अजय देवगणच्या दमदार आवाजाने होते. त्यानंतर चित्रपट मंद गतीने पुढे सरकतो. चित्रपट राजघराण्यातील अंतर्गत कटकारस्थानातून बाहेर पडत नाही की, मध्यांतर होते. मध्यांतरानंतर सिंहल द्वीप अर्थात श्रीलंकेवर चोल साम्राज्य अतिभव्य अंदाजात सैन्य नेतानाचे दृश्य दाखवण्यात येतात. मात्र, ती लढाई देखील काही विशेष नसते. पण, मध्यांतरातील समुद्रावर चित्रीत केलेला वॉर सीक्वेंस नक्कीच प्रेक्षकांना भावतो, यात काही शंका नाही. दिग्दर्शक मणिरत्नम यांनी या महाकथेला भव्यदिव्य प्रकारात चित्रीत केले आहे. परंतु, चित्रपटाची गती प्रचंड मंद असल्याने चित्रपट पाहताना तो रोमांच फारसा अनुभवता येत नाही. चित्रपट एकदम धमाकेदार असणार असे गृहित धरून प्रेक्षक येतात आणि काही प्रमाणात प्रेक्षकांची निराशा होते.

अभिनय : कलाकारांच्या बाबतीत पाहिले तर, यात कीर्तीने यात सुंदर काम केले आहे. सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत तिच्या अभिनयातील सर्व रंग पाहायला मिळतात. तसेच जयम रवि यांची एंट्री उत्तरार्धात होते, तरीही तो प्रचंड प्रभावी ॲक्टींग करतो. चियान विक्रमला पहिल्या भागात जास्त काही संधी मिळाली नाही. ऐश्वर्या नेहमीप्रमाणेच आकर्षक दिसते. तृष्णा कृष्णन हिने एकदम चतुरपणे राजकुमारीचे काम केले आहे. चित्रपटाचे संगीत ए.आर.रहमान यांचे असून रविवर्मन यांनी सिनेमॅटाग्राफी मध्ये कमाल केली आहे.

सकारात्मक : तुम्ही जर चोल साम्राज्याची महागाथा भव्य स्वरूपात पाहू इच्छिता तर तुम्ही वीकेंडला चित्रपटगृहात जाऊ शकता.
नकारात्मक : तुम्ही जर काही खुप भव्य आणि धमाकेदार बघण्याचे डोक्यात ठेऊन जाल, तर तुमची निराशा होऊ शकते.

थोडक्यात : तगडी स्टारकास्ट, उत्कृष्ट दिग्दर्शन, संगीत, सिनेमॅटोग्राफी हे सर्व बघता वीकेंडला चित्रपट नक्कीच बघू शकता.
 

Web Title: Ponniyin Selvan Movie Review :Aishwarya Roy Bachchan Ponniyin Selvan Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.