दुसऱ्यांदा आई होणार लोकप्रिय अभिनेत्री, पोस्टद्वारे चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 10:07 IST2025-04-22T10:07:17+5:302025-04-22T10:07:31+5:30
लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे.

दुसऱ्यांदा आई होणार लोकप्रिय अभिनेत्री, पोस्टद्वारे चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!
Pooja Banerjee Second Pregnancy: हिंदी मालिकांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी (Pooja Banerjee) हिने गुड न्यूज दिली आहे. पूजा बॅनर्जी दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसतेय. पूजा बॅनर्जी आणि तिचा पती संदीप सेजवाल लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत. २०१७ मध्ये लग्न करणाऱ्या या जोडप्याने पुन्हा आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली आहे. लग्नानंतर आठ वर्षांनी पूजा दुसऱ्यांदा आई होणार आहे.
पूजा आणि संदीप यांनी त्यांच्या सोशल मीडियावर मॅटरनिटी फोटोशूट शेअर केले आहेत. अभिनेत्रीची ही पोस्ट आता बरीच चर्चेत आहे. ही आनंदाची बातमी दिल्यावर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांनी कमेंट्समध्ये तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या जोडप्याला आधी एक मुलगी आहे. तिचं सना असं नाव आहे. सनाचा जन्म २०२२ मध्ये झाला होता. अलिकडेच पूजाने एका मुलाखतीत पुजानं तिला नेहमीच दोन मुले हवी होती आणि आता तिची इच्छा पूर्ण होत असल्याचं म्हटलं.
पूजा बॅनर्जीने २८ फेब्रुवारी २०१७ रोजी राष्ट्रीय जलतरणपटू संदीप सेजवालशी लग्न केलं होतं. पुजाने सध्या सध्या कामातून ब्रेक घेतला आहे. ती मुंबई सोडून नवी दिल्लीला राहायला गेली असून सर्व वेळ तिच्या कुटुंबासोबत घालवते. मुंबईत परतण्याबद्दल ती म्हणाली, "मला मुंबई, कॅमेरा आणि अभिनयाची खूप आठवण येते. पण, मुंबईपेक्षा हे शहर खूप वेगळे आहे. आमचं संयुक्त कुटुंब आहे, कुटुंबातील अनेक सदस्य मुलांची काळजी घेतात. घरात नेहमी कोणतं ना कोणतं सेलिब्रेशन होत असतं. मुख्य म्हणजे इथे मुंबईपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे मला माझ्या मुलांना वाढवण्यासाठी, त्यांना खेळण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी पुरेशी जागा इथे आहे याचा मला आनंद आहे".
पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असते. या आधी पूजा बॅनर्जीनं 'चंद्र नंदिनी', 'नागार्जुन - एक योद्धा', 'द अॅडव्हेंचर्स ऑफ हातिम', 'दिल ही तो है', 'कसौटी जिंदगी की', 'कुमकुम भाग्य' अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.