प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांनी वयाच्या सत्तरीमध्ये केलं चौथ लग्न; बाप-लेकीचा वाद आला चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 11:01 AM2023-09-01T11:01:31+5:302023-09-01T11:02:24+5:30

चार लग्न करणारा हा अभिनेता परवीन बाबी यांच्यासोबत रिलेशनशीपमध्येही होता.

pooja-bedi-venomous-comment-against-father-kabir-bedi-after-his-4th-marriage-with-parveen-dusanj | प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांनी वयाच्या सत्तरीमध्ये केलं चौथ लग्न; बाप-लेकीचा वाद आला चव्हाट्यावर

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांनी वयाच्या सत्तरीमध्ये केलं चौथ लग्न; बाप-लेकीचा वाद आला चव्हाट्यावर

googlenewsNext

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी (kabir bedi) यांचे जितके सिनेमा गाजले त्यापेक्षा कैकपटीने त्यांचं खासगी आयुष्य चर्चेत राहिलं.  कबीर बेदी यांनी चार लग्न केली होती. इतकंच नाही तर लोकप्रिय अभिनेत्री परवीन बाबी (parveen babi) यांच्यासोबतही ते रिलेशनमध्ये होते. त्यामुळे त्यांची लव्हलाइफ प्रचंड चर्चेत राहिली. विशेष म्हणजे वडिलांचं हे वागणं त्यांच्या लेकीला म्हणजेच पूजा बेदीला (pooja bedi) जराही मान्य नव्हतं. त्यामुळे कबीर बेदी यांनी चौथ लग्न केल्यावर पूजा प्रचंड संतापली होती. याविषयी त्यांनी ‘स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाईफ ऑफ अॅन अॅक्टर’ या पुस्तकात नमूद केलं आहे.

एकेकाळी परवीन बाबी आणि कबीर बेदी यांच्या नात्याविषयी अनेक चर्चा रंगत होत्या. इतकच नाही तर त्या काळात काही एंटरटेन्मेंट मॅगेझिनमध्ये या दोघांविषयी रोज काही ना काही छापून येत होतं. त्यामुळेच कबीर बेदी यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांच्या लव्हलाइफविषयी भाष्य केलं. या पुस्तकात त्यांनी पहिली पत्नी प्रोतिमा बेदी यांच्याविषयी सुद्धा लिहिलं होतं.

प्रोतिमा बेदी यांना कबीर बेदी आणि परवीन बाबी यांच्या नात्याबद्दल कोणताच आक्षेप नव्हता. परंतु, त्यांच्या मुलीला पूजाला हे नातं मान्य नव्हतं. तसंच कबीर बेदी यांनी केलेलं चौथ लग्नही तिला पटलं नव्हतं. विशेष म्हणजे या बाप-लेकीमधील वाद सगळ्यांना ठावूक होता. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांच्यातील वाद चर्चेत आला होता.

कबीर बेदी यांनी २०१६ मध्ये चौथ लग्न केलं. त्यांच्यापेक्षा वयाने ३० वर्ष लहान असलेल्या परवीन दुसांझ हिच्याशी त्यांनी चौथ लग्न केलं. परवीन ही पूजापेक्षाही ५ वर्षांनी लहान आहे. विशेष म्हणजे हे लग्न करण्यापूर्वी कबीर आणि पूजा यांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, या लग्नाला पूजाने कडाडून विरोध केला होता. या जोडीने हे लग्न केल्यानंतर पूजाने सोशल मीडियावर एक ट्विट करत पूजावर म्हणजेच तिच्या सावत्र आईवर बरेच ताशेरे ओढले होते. इतकंच नाही तर तिने पूजाला डायन असंही म्हटलं होतं. परंतु, त्यानंतर तिने हे ट्विट डिलीट केलं.

Web Title: pooja-bedi-venomous-comment-against-father-kabir-bedi-after-his-4th-marriage-with-parveen-dusanj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.