बोल्डनेसमुळे चर्चेत येणाऱ्या पूनम पांडेची आई राहते प्रचंड साधी; Lock upp च्या घरात लेकीला पाहून झाल्या भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:58 IST2022-04-27T13:56:18+5:302022-04-27T13:58:07+5:30
Poonam pandey: Lock Upp या शोमध्ये पूनमच्या आईने एन्ट्री केली आणि पूनमची स्ट्रगल स्टोरी सांगताना त्या भावुक झाल्या.

बोल्डनेसमुळे चर्चेत येणाऱ्या पूनम पांडेची आई राहते प्रचंड साधी; Lock upp च्या घरात लेकीला पाहून झाल्या भावुक
लॉकअप (Lock Upp) हा शो सध्या टीआरपीच्या शर्यतीत चांगलीच यशस्वी घोडदौड करत आहे. आतापर्यंत या शोमध्ये अनेक स्पर्धकांनी त्यांच्या जीवनातील सिक्रेट्स जाहीरपणे सांगितले आहे. इतकंच नाही तर बऱ्याचदा हे सिक्रेट्स ओपन करताना त्यांचे डोळे पाणावलेदेखील आहेत. या शोमध्ये सुरुवातीपासून काही स्पर्धक सातत्याने चर्चेत येत आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे पूनम पांडे (Poonam Pandey) . बोल्ड फोटोशूट आणि व्हिडीओशूटमुळे कायम चर्चेत येणाऱ्या पूनमचं या शोमध्ये वेगळंच रुप प्रेक्षकांना पाहायला मिळालं. त्यामुळे पूनम या शोमुळे लोकप्रिय झाली. यामध्येच आता या शोमध्ये पूनमच्या आईने एन्ट्री केली आणि पूनमची स्ट्रगल स्टोरी सांगताना त्या भावुक झाल्या.
अश्लील व्हिडीओ शूट आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत येणाऱ्या पूनमला अनेकांनी ट्रोल केलं. मात्र, तिने आयुष्यात बरंच स्ट्रगल केलं असून याविषयी तिच्या आईने खुलासा केला आहे.
"या मुलीने मला आयुष्यात बरेच सुखाचे दिवस दाखवले. माझी प्रत्येक इच्छा याच मुलीने पूर्ण केली. आयुष्यात अशी कोणतीही गोष्ट हिने शिल्लक ठेवली नाही जी आम्हाला मिळाली नाही. त्यामुळे तिच्याकडे पाहिलं की शरीराच्या प्रत्येक भागातून फक्त तिच्यासाठी केवळ आशीर्वाद येतो", असं पूनमचं आई म्हणाली.
दरम्यान, पूनमला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या आईने येतांना तिच्यासाठी खास लाडू आणले होते. सोबतच तिच्या वहिनीला दोन जुळ्या मुली झाल्या ही गूडन्युजदेखील त्यांनी दिली.