टीम इंडिया जिंकली तर कपडे उतरवण्यास तयार पण...! पूनम पांडे पुन्हा बोलली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 12:23 PM2021-06-20T12:23:48+5:302021-06-20T12:29:03+5:30
याआधी वर्ल्ड कपदरम्यान सुद्धा पूनमने अशीच घोषणा केली होती. 2011 साली वर्ल्ड कप दरम्यान पूनमने भारत जिंकला तर नग्न अवस्थेत मैदानावर धावेन, असे तिने म्हटले होते.
भारत आणि न्यूझिलंडमध्ये यांच्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच सुरू आहे आणि क्रिकेटप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. भारताने हा सामना जिंकावा, यासाठी भारतीय देव पाण्यात बुडवून बसले आहेत. बॉलिवूडची अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) त्यापैकीच एक़ अर्थात तिचा प्रार्थना करण्याचा अंदाज काहीसा वेगळा. होय, पूनमने पुन्हा एकदा भारताने हा सामना जिंकलाच तर कपडे उतरवण्याची तयारी दर्शवली आहे. (Poonam Pandey to strip again)
याआधी वर्ल्ड कपदरम्यान सुद्धा तिने अशीच घोषणा केली होती. 2011 साली वर्ल्ड कप दरम्यान पूनमने भारत जिंकला तर नग्न अवस्थेत मैदानावर धावेन, असे तिने म्हटले होते. अर्थात तिची ही घोषणा म्हणा वा वचन म्हणा हवेत विरले होते. बीसीसीआयने परवानगी नाकारल्याचे कारण यासाठी तिने पुढे केले होते. आता पुन्हा एकदा पूनमने तशीच तयारी दर्शवली आहे.
‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत ती बोलली. पूनम सध्या आपल्या पतीसोबत गोव्यात आहे. त्यावेळी तिला भारत-न्यूझीलंड यांच्यात होणाºया मॅचबद्दल प्रश्न विचारण्यात आला. भारत आणि न्यूझीलंडची मॅच सुरू आहे, यावर काही प्रतिक्रिया देणार का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला आहे. यावर ‘क्रिकेट चालू आहे? मग मी पुन्हा स्ट्रिप होण्याचे बोलू, अशी तुमची इच्छा आहे का? टीम इंडिया यावेळी जिंकल्यास मी स्ट्रीप करेन, अर्थात माझी तयारी आहे. पण करायचं की नाही तुम्ही ठरवा,’ असे ती म्हणाली.
अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. तिचे हे फोटो आमि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते. पूनम पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती ‘द जर्नी आॅफ कर्मा’मध्ये शक्ती कपूरसोबत दिसली होती. या चित्रपटातील बोल्ड सीनमुळे ती चर्चेत आली होती. या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर कमी प्रतिसाद मिळाला होता. तसेच तिने ‘तेरा नशा’ यासारख्या चित्रपटात सुद्धा काम केले आहे.