'तो मला बेडरुमध्ये बंद करायचा आणि...'; अभिनेत्रीने केला पतीविषयी धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 04:24 PM2022-03-06T16:24:00+5:302022-03-06T16:24:31+5:30

Poonam pandey: एका अभिनेत्रीने या शोमध्ये तिच्या पतीवर काही गंभीर आरोप  केले आहेत. यात खासकरुन, नवरा मला बेडरुममध्ये कोंडून ठेवायचा असा खुलासा तिने केला आहे.

poonam pandey talk about her relationship with husband sam bombay says he locked in a room lock upp | 'तो मला बेडरुमध्ये बंद करायचा आणि...'; अभिनेत्रीने केला पतीविषयी धक्कादायक खुलासा

'तो मला बेडरुमध्ये बंद करायचा आणि...'; अभिनेत्रीने केला पतीविषयी धक्कादायक खुलासा

googlenewsNext

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणाऱ्या कंगना रणौतचा (Kangana Ranaut)  लॉक अप (Lock Upp) हा रिअॅलिटी शो अलिकडेच सुरु झाला आहे. या शोमध्ये सातत्याने चर्चेत राहिलेल्या अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे सध्या या कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफचीही चर्चा होतांना दिसत आहे. यामध्येच एका अभिनेत्रीने या शोमध्ये तिच्या पतीवर काही गंभीर आरोप  केले आहेत. यात खासकरुन, नवरा मला बेडरुममध्ये कोंडून ठेवायचा असा खुलासा तिने केला आहे.

पूनम पांडे (Poonam Pandey) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. अनेकदा बोल्ड फोटोशूट, व्हिडीओ शूट करुन ती चर्चेत येत असते. याचा पूनमने कंगनाच्या लॉक अपमध्ये सहभाग घेतला आहे. या शोमध्ये आल्यानंतर तिने पती सॅम बॉम्बेवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

काय आहे पूनमचा आरोप?


"मी जवळपास चार वर्ष सॅमसोबत रिलेशनमध्ये होते. पण, या चार वर्षात मला एकदाही सुखाची झोप मिळाली नाही. मला अनेकदा नीट जेवायलाही मिळत नव्हतं. तो सतत मला मारहाण करायचा. सॅम कायम मला बेडरुममध्ये बंद करुन ठेवायचा. आणि एखाद्या जनावराप्रमाणे मला बेदम मारहाण करायचा", असं पूनम म्हणाली.

पुढे ती म्हणते, "माझा कोणाशीही संपर्क व्हायला नको म्हणून त्याने माझा फोनही तोडला. तो मला इतका त्रास द्यायचा की असं वाटायचं की आपण काही तरी जीवाचं बरंवाईट करुन घ्यावं. मी अनेकदा स्वत: ला इजा पोहोचवण्याचाही प्रयत्न केला."
 

Web Title: poonam pandey talk about her relationship with husband sam bombay says he locked in a room lock upp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.