VIDEO- हिंदी ‘पोस्टर बॉईज’चं पोस्टर व ट्रेलर रिलीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 03:05 PM2017-07-24T15:05:00+5:302017-07-24T15:10:22+5:30
सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे यांच्या हिंदी ‘पोस्टर बॉईज’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24- कुटुंब नियोजनाचा संदेश देणारा अभिनेता श्रेयस तळपदे याची निर्मिती असलेला ‘पोश्टर बॉईज’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. मराठी सिनेसृष्टीतील धमाकेदार एन्ट्रीनंतर आता या सिनेमाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे यांच्या हिंदी ‘पोस्टर बॉईज’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘यमला पगला दीवाना २’ नंतर सनी देओल आणि बॉबी देओल हे भाऊ आता पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
Trailer out today at 1:30 PM #posterboystrailer#posterboys@thedeol@shreyastalpade1pic.twitter.com/dtWaMTapCm— Sunny Deol (@iamsunnydeol) July 24, 2017
सिनेमाच्या पोस्टरमध्ये यात सनी, बॉबी आणि श्रेयस पगडी घातलेले दिसतात. ‘हमने नसबंदी करा ली, आप भी करा लो’, असं या पोस्टवर लिहिलं आहे, या टॅगलाइनवरूनच हा सिनेमाचा मुख्य मुद्दा असल्याची चर्चा आहे. ‘पोश्टर बॉईज’ या सिनेमाची मराठीत निर्मिती केल्यानंतर स्वतः श्रेयस तळपदे हिंदी ‘पोस्टर बॉईज’चं दिग्दर्शन करत आहे. सिनेमाता ट्रेलरही पोस्टर प्रमाणे धमाकेदार आहे. एक हटके कहाणी या ट्रेलरमध्ये दिसून येते आहे. तसंच बॉबी देओल, सनी देओल आणि श्रेयस तळपदे या तीघांचा वेगवेगळा अंदाज ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो आहे. सनी आणि बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसुद्धा झळकणार आहे.
आणखी वाचा
First Look: अभिनेता फरहान अख्तर "लखनऊ सेंट्रल"मध्ये कैद
सल्लूमियाँच्या कॅरेक्टरची अशीही झलक!
हिंदी पोस्टर बॉईज या सिनेमाची स्क्रिप्ट ऐकताच सर्व कलाकार सिनेमात काम करण्यासाठी तयार झाले. कारण त्यांनी याआधी अशा सिनेमात काम केलं नव्हतं. या एकाच कारणामुळे हे कलाकार म्हणूनच हे दोघं काम करायला लगेच तयार झाल्याचं अभिनेता-दिग्दर्शक श्रेयस तळपदे याने सांगितलं आहे. 8 सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे
मराठीतील पोश्टर बॉईज हा सिनेमा दिग्दर्शक समीर पाटील यांनी दिग्दर्शित केला होता. यामध्ये अभिनेते दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव या तीघांनी तीन वेगवेगळी धमाल पात्र स्क्रीनवर साकारली होती. ग्रामीण भागात घडणाऱ्या या सिनेमात नसबंदीवर केलेलं भाष्य प्रेक्षकांच्याही पसंतीस पडलं होतं. आता हा सिनेमा हिंदीतही प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.